26 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरराजकारणजनसेवेचा ध्यास, पुरग्रस्तांसोबत चार घास

जनसेवेचा ध्यास, पुरग्रस्तांसोबत चार घास

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बुधवारी पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पुराचा तडाखा बसलेल्या भागाची पाहणी केली. पण या पाहणी दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राला झाले. कारण या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुराचा फटका बसलेल्या नागरिकांसोबत एकत्र जेवण केले. यावेळी त्यांनी नागरिकांसोबत मोकळेपणे संवाद साधत त्यांच्या व्यथा समजून घेतल्या.

गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. या पावसात अनेकांचे संसार देशोधडीला लागले. ह्याचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला असला तरी सातारा, सांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुधवार, २८ जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला.

यावेळी सातारा जिल्ह्यातील मोरगिरी आंबेघर या भागात उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासी शिबिराला त्यांनी भेट दिली. पाऊस आणि पूर त्यामुळे संसार उघड्यावर पडलेल्या नागरिकांची सोय या शिबिरांमध्ये करण्यात आली आहे. या निवासी शिबिरातील नागरिकांची जेवणाची व्यवस्था मोरगिरी येथील मोरणा विद्यालयात करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या नागरिकांची भेट घेण्यासाठी गेले असता त्यांनी पूरग्रस्तांसोबत भोजनही केले.

हे ही वाचा:

नारायण राणे महाराष्ट्राबद्दल ‘हे’ म्हणाले

छगन हरण बघ

का दुःखी आहेत एसटीचे सेवानिवृत्त कर्मचारी?

भाजपा आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री निधीला

यावेळी फडणवीस आणि दरेकर यांच्या वागणुकीत किंवा देहबोलीत कुठल्याही पाद्धतीचा बढेजाव नव्हता किंवा नागरिकांच्या वर्तनातही अवघडलेपण दिसले नाही. त्या शिबिरातील पुरग्रस्त नागरिकांच्या समवेत फडणवीस आणि दरेकर यांनी जमिनीवर बसून त्या नागरिकांसाठी बनवलेला डाळभात खाल्ला. यावेळी इतरही नागरिक त्यांच्या सोबत जेवताना दिसले. तर एकीकडे नागरिक आपले प्रश्न, अडचणी या नेत्यांना सांगत होते.

या प्रसंगातून देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांची जमिनीशी जोडलेली नाळ अजूनही तुटलेली नाही हे पुन्हा एकदा दिसून आले. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यादरम्यान सत्ताधारी पक्षाचे आमदार नागरिकांवर आरेरावी करताना, हात उचलताना दिसले. तर विरोधी पक्षाचे नेते मात्र नागरिकांच्या व्यथा समजून घेत त्यांच्यासोबत आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे नाते निर्माण करताना दिसत आहेत

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

  1. घोषणा लाखों अध्यादेश,राजपत्र, परिपत्रक कधीच निघत नाही.
    काॅग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ची हि सरकार चालवण्याची खासियत आहे. बोलघेवडे मंत्री व मुठभर आमदार बडबड गीते गाताना रोज कुठल्या तरी वाहिनीच्या माध्यमातून दिसतात. पण कृती काही हि नाही.

    ह्यांना म्हणजे सत्ताधारी सरकारच्या फायद्याचे व भ्रष्टाचार करण्यासाठी संधी असलेल्या केंद्र सरकार
    ने‌ घोषित केलेल्या व राज्यांनी त्यांची अंमलबजावणी करावी, अश्या योजनांचे तात्काळ शिव, शिव शाही, बाळासाहेब ठाकरे असली नाव लावून राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला निर्णय, म्हणून राबवतात.

    शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घोषणा, निर्णय, वृत्त ह्या सगळ्यांचा एकमेकांशी ताळमेळ अथवा जुळवा जुळव करण्याचा प्रयत्न केला. तर हाती काही लागत नाही. २९ नोव्हेंबर, २०१९ ला महाराष्ट्र राज्यातील जनता, मतदार व कामासाठी बाहेरील राज्यातून येणारी देशांचे नागरिक ह्यांचा “विध्वंस काळ” चालू झाला आहे.

    महाराष्ट्र चे स्वयंम् घोषित अथवा ज्यांना स्वताचा बाप नाहीत. असे पाळलेले मनुष्य प्राणी व त्यांच्या सोबत फरफटत चाललेले खळखट्याक कार्येकर्ते असे…..
    “ब्रम्हांडनायक राजाधिराज अकार्यक्षम खंडणीखोर हफ्ते उचलणारे आंतरराष्ट्रीय माफिया शी संबंध असलेले महाराष्ट्रातील जनता व मतदार चे खुनी, २००० शेतकरी आत्महत्यांचे जनक,
    जनाब, सल्लतन-ए-मातोश्री२ वजीर-ए-आलम, शेख उद्धवउद्दीन महाराष्ट्र राज्यांचे कुटुंब प्रमुख (फक्त पैसा कमावण्यासाठी, बाकी सगळ्या साठी #महाराष्ट्रजवाबदार) हे ज्या दिवशी पदावरून पायउतार होतील अथवा लाथ बसेल. त्या दिवशी देशातील ज्योतिष विद्या मंदिरातून “विध्वंस काळ” हा नविन‌ शोध शिकवण्यात येईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा