वाझेंना ऑपरेट करणारे सरकारमध्ये बसले आहेत – देवेंद्र फडणवीस

वाझेंना ऑपरेट करणारे सरकारमध्ये बसले आहेत – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. सचिन वाझे विषयांत बोलताना त्यांनी ठाकरे सरकारची पिसे काढली. यावेळी फडणवीसांनी अनेक महत्वाच्या विषयांवर भाष्य करताना पोलिस आयुक्तांची तर बदली केली, पण सचिन वाझेंना ऑपरेट करणारे सरकारमधील जे आहेत, त्यांचा शोध घेणे गरजेचे आहे असे म्हटले आहे.

शिवसेना नेत्यांसोबत वाझेंचे व्यावसायिक संबंध
यावेळी फडणवीसांनी एपीआय वाझे यांना पुन्हा पोलीस दलात नोकरीवरच का घेतले असा सवाल उपस्थित केला. माझ्याही सरकारच्या काळात वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा प्रस्ताव आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंसकट शिवसेना नेत्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही महाधिवक्तांचा सल्ला घेऊन तो प्रस्ताव फेटाळला पण ठाकरे सरकारने कोविडचे कारण पुढे निरंतर त्यानं पुन्हा सेवेत घेतले आहे. वाझे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते. ते सेनेचे प्रवक्तेही होते. शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत वाझे यांचे व्यावसायिक संबंध असल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट फडणवीसांनी केला आहे.

हे ही वाचा:

कोण आहेत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे?

अखेर परमबीर सिंह यांची हकालपट्टी

परमबीर सिंह यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना अटक करा – अतुल भातखळकर

वाझेंना वसुली अधिकारी म्हणून ठेवले होते
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वाझे यांचे निलंबन झालेले असतानासुद्धा कोरोनाचे कारण देत वाझे यांना पुन्हा सेवेत घेतले गेले. त्यांच्यापेक्षा तुलनेने लहान आरोप असलेले पोलीस अधिकारी सेवेत घेतले गेले नाहीत. पण वाझे यांना नियुक्त करताना थेट क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये नियुक्त करण्यात आले. वाझेंना तिथे सीआययू प्रमुख म्हणून नाही तर वसुली अधिकारी म्हणून ठेवले गेले. मुंबईत डान्सबार चालविण्यासाठी खुली सूट आणि इतर अनेक गैर कारभारांचे प्रमुख सचिन वाझेच होते असे फडणवीस म्हणाले.

वाझे आणि मनसुखच्या संभाषणाच्या टेप्स
मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली असे आमचे म्हणणे आहे. या विषयात एटीएस आणि एनआयए कडे काही ऑडिओ टेप्स आहेत ज्यात वाझे आणि मनसुख यांच्यात झालेले संभाषण आहे असे फडणवीस यांनी सांगितली. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपासही एनआयएने करावा. महाराष्ट्र सरकार या विषयात अपयशी ठरले आहे. वाझे यांना सीआययु युनिट मध्ये का आणण्यात आले याचीही चौकशी करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

Exit mobile version