महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलीस प्रशासनावर आणि गृह खात्यावर ताशेरे ओढले आहेत. नागपूर येथे ते बोलत होते. ‘आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत त्यामुळे पहिले तक्रार करू, पण कारवाई झाली नाही तर मात्र आम्ही सोडणार नाही.’ असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार विरुद्ध विरोधी पक्ष हा सामना अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
पोलिसांच्या संरक्षणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर हल्ले करण्यात येत आहेत. पोलिस संरक्षणात आमच्या नेत्यांच्या सभांमध्ये आंदोलन करून आमच्या नेत्यांवर अंडे, टमाटर फेकण्याचा प्रयत्न होत आहे. हे सगळे पाहिल्यावर स्पष्टपणे लक्षात येत आहे की हे सगळं केवळ आपलं राज्य आहे, आपले गृहमंत्री आहेत या तोऱ्यामध्ये सुरु आहे. मी कालच सांगितलं की आम्ही लोकशाही मानणारे लोक आहो. त्यामुळे पहिल्यांदा तक्रार करू. पण कारवाई झाली नाही तर मात्र आम्ही सोडणार नाही.
हे ही वाचा:
मोदी सरकारचा मोठा निर्णय; गव्हाच्या निर्यातीवरील बंदीमध्ये शिथिलता
मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद उभारल्याचा सलमान खुर्शीद यांचा दावा
पंतप्रधान मोदींच्या कान्स चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा
श्रीलंकेचे नवे पंतप्रधान विमान कंपनी विकणार, वेतन देण्यासाठी पैसे छापणार
तर सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या भूमिकेवरही फडणवीसांनी आपले मत मांडले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की कोणी हात उगारला तर हात तोडू. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की त्यांनी सगळ्याच बाबतीत अशाप्रकारे भूमिका घेतली पाहिजे. नवनीत राणा सोबत जे झाले तेव्हा त्या काही बोलल्या नाहीत. अशा प्रकारचे हल्ले झाले त्यावेळेला त्या काही बोलल्या नाहीत. आमच्याही महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी वाईट पद्धतीने वागणूक दिली तेव्हाही सुप्रिया ताई काही बोलल्या नाहीत असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.