24 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरराजकारणहिवाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या तयारीत ठाकरे सरकार

हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या तयारीत ठाकरे सरकार

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या तयारीत आहे असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्य सरकारला कोणत्याच शासकीय कामकाजात रस नाही असा आरोप फडणवीस यांनी केला आहे. ठाकरे सरकारने हिवाळी अधिवेशनाचा कालावधी न वाढवता केवळ पाच दिवसांचेच अधिवेशन घेत असल्यावरून फडणवीस आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले होते. पण या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आपण या बैठकीवर समाधानी नसल्याची भावना व्यक्त केल्या आहेत. ठाकरे सरकार केवळ अधिवेशन गुंडाळण्याचा तयारीत असल्याचे फडणवीस यांचे म्हणणे आहे.

सरकारकडून केवळ पाच दिवसांचे अधिवेशन पार पाडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या पैकी पहिला दिवस हा शोक प्रस्तावात जातो. त्यानंतर कामकाजासाठी केवळ चार दिवस शिल्लक राहतात असे फडणवीस म्हणाले.

सरकारने पुढे केले ३१ डिसेंबरचे कारण
३१ डिसेंबरचे कारण पुढे करत सरकारने अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवला आहे. ३१ डिसेंबरला लोकं सेलेब्रेशनसाठी बाहेर जातात असे सांगत सरकारने अधिवेशन कालावधी ठेवला आहे. यावेळी फडणवीसांनी ३-४ दिवसांची विश्रांती ठेऊन जानेवारीत पुन्हा अधिवशन सुरु करावे असा प्रस्ताव सरकारपुढे ठेवला. जानेवारीत ६-७ दिवस अधिवेशन घेतले जावे असा प्रस्ताव फडणवीस यांनी ठेवला होता पण सरकारने सध्या तरी तो विचारात घेतले नाहीये. दरम्यान येणाऱ्या काही दिवसांत पुन्हा एकदा या विषयावर चर्चा करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडणार आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्राची डोकेदुखी वाढली! साऊथ आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

मथुरामध्ये जमावबंदी! कृष्ण जन्मभूमीवरील मशिदीचा वाद पुन्हा येणार ऐरणीवर?

भाईंदरमध्ये फेरीवाल्याकडून पालिका अधिकाऱ्यावर रॉडने हल्ला

‘सदन की कार्यवाही शुरु…’ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

२ वर्षांत अतारांकित प्रश्नांना उत्तरेच नाहीत
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपण सरकारवर नाराज असलयताचे सांगितले. गेल्या दोन वर्षात सरकारकडून एकही अतारांकित प्रश्नाला सरकार मार्फ़त उत्तर देण्यात आलेले नाही असे फडणवीस यांनी सांगितले. अतारांकित प्रश्नांना सरकार केव्हाही उत्तर देऊ शकते. त्यासाठी अधिवेशनाची गरज नसते. पण त्याच्याकडे सरकारने सोयीस्कर पाठ फिरवली जात आहे. पण सरकारने आता सर्व अतारांकित प्रश्नांना अधिवेशनाच्या आधी सरकार उत्तर देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

तर अधिवेशन काळात सरकार प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी घेत नसल्यावरही फडणवीसांनी बोट ठेवले. तर आगामी अधिवेशनात रोज प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी घेण्याचा प्रस्ताव विरोधी पक्षातर्फे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनात ते बघायला मिळण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला?
महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचा प्रगाध आहे. पण यंदाचे हिवाळी अधिवेशन हे मुंबईतच घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. पण विरोधी पक्षातर्फे मात्र अधिवेशन नागपूरलाच झाले पाहिजे ही मागणी करण्यात आली होती. सलग दोन वर्ष नागपुरात अधिवेशन घेण्यात आले नाही. त्यामुळे विदर्भाच्या नागरिकांची निराशा झाली आहे. पण जाणीवपूर्वक तिथे अधिवेशन घेतले जात नाहीये. मुख्यमंत्र्यांना वैद्यकीय कारणांमुळे रेल्वे किंवा विमान प्रवासाला परवानगी नाही. त्यामुळे अधिवेशन मुंबईला घेण्यात येणार आहे. पण अशा परिस्थितीत मार्चचे अधिवेशन नागपूरला घेण्याची मागणी फडणवीसांनी केली आहे.

नो गव्हर्नन्स, ओन्ली गव्हर्नमेंट
ठाकरे सरकारला दोन वर्ष झाल्याबद्दल फडणवीस म्हणाले की, सरकारने काहीही सांगितले तरी जनतेने सगळं बघितले आहे. जनतेचा रोष दिसत आहे. ‘नो गव्हर्नन्स, ओन्ली गव्हर्नमेंट’ असे फडणवीस म्हणाले आहेत. या दोन वर्षात सरकारने कामच केले नसल्यामुळे त्याचे मूल्यमापन होऊ शकत नाही असे फडणवीस म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा