महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असून या अधिवेशनाचा दुसरा दिवसाचीही वादळी सुरुवात झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सभागृहात चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला आहे. ओबीसी आरक्षणा शिवाय राज्यात कोणत्याच निवडणुका घेऊ नयेत अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे. तर आजच्या दिवसाचे सर्व कामकाज बाजूला ठेवून ओबीसी आरक्षणावर चर्चा करावी अशी भूमिकाही विरोधी पक्षाने घेतली आहे.
सरकारने या संदर्भात ठाम भूमिका घेणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. दरवेळी सरकार याबाबत भूमिका घेते पण अंमलात आणत नाही. फक्त मंत्रिमंडळ ठराव करून काही होत नाही. जर सरकार ठराव करत असेल तर त्याची अंमलबजावणी करण्याची हिम्मतही सरकारने दाखवली पाहिजे असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.
हे ही वाचा:
भारतीय संघापुढे श्रीलंका आव्हान उभे करणार?
शतकांच्या कसोटी यज्ञांतून उठली विराट ज्वाला
ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणूक नाहीत
नवाब मलिक यांना सोमवारपर्यंत ईडी कोठडी
आगामी काळात राज्यातील दोन त्रितीयांश निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुका जर पार पडल्या तर महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला कधीच आरक्षण मिळणार नाही असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले. तेव्हा राज्यातील ओबोसी समाजाला न्याय देण्यासाठी जर कायदा करायचा असल्यास तो करावा अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आहे.
त्यासाठी आज दिवसभराचे सर्व कामकाज बाजूला ठेवून अधिवेशनात फक्त ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी अशी भूमिका विरोधी पक्षाने घेतली आहे. काळ सर्वोच्च न्यायालयात ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्णपणे संपले आहे. सरकारचे हसे झाले आहे अशी तोफ फडणवीस यांनी डागली. यानंतर अधिवेशनाचे कामकाज हे २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.