म्हाडाची भरती परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रकरणावरून राज्यात आता विरोधी पक्ष आक्रमक झालेला बघायला मिळत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भरती परीक्षेच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तरी करू नका असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.
महाराष्ट्रात सातत्याने सुरू असलेला भरती परीक्षांचा गोंधळ काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आरोग्य भरती परीक्षांच्या गोंधळाचे प्रकरण ताजे असतानाच आता ‘म्हाडा’ च्या परीक्षेचा गोंधळ समोर आला आहे. रविवार, १२ डिसेंबर रोजी होणारी ‘म्हाडा’ ची भरती परीक्षा अचानक पणे पुढे ढकलण्यात आली आहे. शनिवार, ११ डिसेंबर रोजी रात्री उशिरा महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भातील घोषणा केली.
सरकारच्या या भोंगळ कारभारा विरोधात राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांसोबतच विरोधी पक्षाचे नेतेही या संदर्भात प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण विषयात समाज माध्यमांतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे ही वाचा:
‘म्हाडा’ भरती परीक्षेत दलालांचा सुळसुळाट? आव्हाड म्हणतात…
‘म्हाडा’ ची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींचा संताप
‘ओबीसी आरक्षण संपवण्याचा ठाकरे सरकारच्या षडयंत्राचा डाव उघड’
…म्हणून पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक झाले?
“राज्यात सुरु असलेल्या आरोग्य भरती परीक्षेचा घोळ! पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत, आता म्हाडाच्या परीक्षेतही तेच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ! सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही! भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस! किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?
राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय! नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका! दोषींवर कठोर कारवाई कराच! पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही?” असा हल्ला फडणवीस यांनी चढवला आहे.
किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे?
राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही?
आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय !
नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करू नका!दोषींवर कठोर कारवाई कराच!
पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही❓— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2021