राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झालेल्या दगडफेकीवर विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण घटनेचा आणि हल्ल्याचा निषेध केला आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो असे फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आपले मत मांडले आहे.
गेले पाच महिने विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संतापाचा कडेलोट आज पहायला मिळाला. आंदोलन करत असलेले हे एसटी कर्मचारी हे आज थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर चालून गेले. यावेळी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर आंदोलनाने हिंसक वळण घेत काही आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर दगडफेक आणि चप्पलफेक सुद्धा केली. या संपूर्ण घटनेचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला आहे.
हे ही वाचा:
पाच लाख दिव्यांपासून साकारली जाणार प्रभू रामचंद्रांची भव्य कलाकृती
शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांकडून दगडफेक
आंदोलकांच्या भितीने अनिल परबांच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ
इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर मतदान होणार
ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या निवासस्थानी झालेली घटना सर्वथा चुकीची आहे. नेते कुठल्याही पक्षाचे असोत, घरांवर अशी आंदोलने अजीबात समर्थनीय नाहीत. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. गेल्या ५ महिन्यांहून अधिक काळपासून एसटी कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांच्या व्यथा, मागण्या योग्यप्रकारे व योग्य व्यासपीठावरच मांडल्या जाव्यात आणि त्या ऐकून घेतल्या जाव्या, अशी अपेक्षाही या निमित्ताने व्यक्त करतो.