फडणवीस, राणे आणि दरेकरांचा आज कोकण दौरा

फडणवीस, राणे आणि दरेकरांचा आज कोकण दौरा

कोकणात जोरदार पावसाने आणि त्यामुळे आलेल्या पुराने, झालेल्या दुर्घटनांनी होत्याचं नव्हतं केलंय. कोकणची गरीब जनता त्रस्त आहेत. कालपर्यंत समृद्ध असणारी माणसं आज संकटात सापडलीत. रायगडच्या महाडमध्ये डोंगरकडा कोसळून तब्बल ४० लोकांना जीव गमवावा लागला. चिपळूण, खेडमधल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज कोकण दौऱ्यावर आहेत. “केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासोबत हा दौरा करतोय.” असं ट्विट फडणवीसांनी केलं.

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संमतीने मी, देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्‍यासह रायगड जिल्ह्यातील तळीये, रत्नागिरीतील चिपळूण येथील दुर्घटनाग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी रवाना होत आहोत, असं ट्विट नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी केलं.

चिपळूणमध्ये महापुरानं हाहा:कार माजला आहे. संपूर्ण बाजारपेठ, एसटी स्टॅन्ड, शेकडो घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं आतोनात नुकसान झालं आहे. पाणी ओसरल्यानंतर आता नागरिकांकडून साफसफाई केली जात आहे. मात्र, ते करत असताना आपलं सर्वस्व गमावल्याचं चिपळूणकरांना पाहायला मिळत आहे.

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील जेईईच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा

आपत्तीची दरड….

भारताने ‘ही’ मदत पाठवल्यामुळे बांग्लादेशने सोडला सुटकेचा निश्वास

कोविड मदत साहित्य पुरवण्यासाठी आयएनएस ऐरावत इंडोनेशियात

केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांचा आज कोकण दौरा आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकण दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, नारायण राणे आणि प्रवीण दरेकर एकाच दिवशी चिपळूणची पाहणी करणार आहेत.

Exit mobile version