लालकृ़ष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार घोषित झाल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली की, अडवाणी हे खऱ्या अर्थाने देशाचे लोहपुरुष आहेत. त्यांनी केलेल्या ६० ते ७० वर्षांच्या राजकारणात जन्मभूमीच्या आंदोलनाची भूमिका, देशाचे गृहमंत्री म्हणून कणखर नेतृत्व ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. राजकारणात इतका मोठा टप्पा गाठूनही ते निष्कलंक राहिले.
फडणवीस म्हणाले की, अडवाणी यांचे विचार आणि त्यांनी केलेला संघर्ष याविषयी आपण जाणून घेतल्यावर त्यांच्याप्रती आदर अधिक वाटतो. त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वाला भारतरत्न हा सन्मान मिळाला ही समाधानाची बाब.
हे ही वाचा:
ललित कला केंद्रातील नाटकातून राम, सीता यांची टिंगल करणाऱ्यांना अटक
यशस्वीचे द्विशतक, बुमराहचा षटकार; भारत सुस्थितीत
राममंदिराबाबत बीबीसीने केलेल्या पक्षपाती वार्तांकनावर ब्रिटिश खासदाराचा संताप
आरएसएस ते ‘भारतरत्न’… कसा आहे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांचा जीवनप्रवास?
अडवाणी यांना हा सन्मान जाहीर झाल्यानंतर त्यांचे पुत्र जयंत अडवाणी यांनी प्रतिक्रिया दिली की, हा सर्वोच्च सन्मान दिल्याबद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. आमच्या कुटुंबासाठी, देशासाठी व आम्हा सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. राममंदिर आंदोलन हे त्यांच्या जीवनातील खूप महत्त्वाचा टप्पा होता. अडवाणींनी रथयात्रा झाली तेव्हा त्यात अनेक अडचणी आल्या. कायदेशीर बाबी समोर आल्या पण आज एवढ्या संघर्षानंतर राम मंदिर उभे राहिले.