देवेंद्र फडणवीसांनी घेतली सुनील यादव यांच्या कुटुंबाची भेट

देवेंद्र फडणवीसांनी घेतली सुनील यादव यांच्या कुटुंबाची भेट

भारतीय जनता पार्टीचे अंधेरी येथील नगरसेवक सुनील यादव यांच्या निधनानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यादव यांच्या कुटुंबाची भेट घेतली. सुनील यादव यांच्या पश्चात पत्नी संध्या मुलगी दिशा आणि मुलगा गौरव असे कुटुंब आहे. गुरुवार, २ सप्टेंबर रोजी देवेंद्र फडणवीसांनी यादव यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा हे देखील त्यांच्या सोबत होते.

भाजपाचे नेते सुनील यादव यांचे बुधवार, १ सप्टेंबर रोजी निधन झाले. कोविड पश्चात उद्भवणाऱ्या प्रकृतीच्या समस्यांमुळे त्यांचे निधन झाले आहे. सुनील यादव हे अंधेरी पूर्व भागाचे प्रतिनिधित्व करताना महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. भारतीय जनता पार्टीच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी पार पडल्या होत्या. २०१४ साली विधानसभा निवडणुकीत यादव हे अंधेरी पूर्व मतदारसंघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार होते. पण त्या निवडणुकीत त्यांचा थोडक्यात पराभव झाला.

हे ही वाचा: 

विराटच्या संघ निवडीवर शशी थरूर वैतागले! म्हणाले…

देशात शाळा झाल्या सुरू; महाराष्ट्राचे काय?

गायीला राष्ट्रीय पशु घोषित केले जावे

सरकारचे डोके ठिकाणावर आले; एसटी कर्मचाऱ्यांसाठी ५०० कोटी वितरित

यादव यांच्या निधनाच्या वृत्ताने मुंबईमध्ये शोककळा पसरली. गुरुवारी देवेंद्र फडणवीसांनी सुनील यादव यांच्या राहत्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी फडणवीसांनी यादव कुटुंबाचे सांत्वन केले. तर “सुनील यादव यांच्या निधनाने भाजपचा एक सच्चा कार्यकर्ता हरपला आहे.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Exit mobile version