उद्धव ठाकरेंशी संबध राहिला नाहीतर राज ठाकरेंशी संबध राहिला आहे. उद्धव ठाकरेंशी पुन्हा युती होणे शक्य नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. एबीपी माझाशी झालेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले. तसेच महायुती मनपा निवडणूक एकत्र लढणार आहे, मुंबईत एकत्र आहोतच , जिथे शक्य तिथे एकत्र , मुबई एकत्र हे पक्के, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
भाजपा आणि उद्धव ठाकरे एकेकाळी सत्तेमध्ये असताना आज एकमेकांच्या विरोधात आहेत. एकमेकांवर आरोप करत विविध अशा कारणांमुळे युती तुटल्याचे नेते सांगत आले आहेत. त्यानंतर पुन्हा युती होवू शकते अशाही बातम्या समोर आल्या होत्या. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत सहमती दर्शविली होती तर अनेकांनी नकार दिला होता. याच दरम्यान, भाजपा आणि उद्धव ठाकरेंची युती होणार का?, या प्रश्नावर थेट मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.
हे ही वाचा :
पाकिस्तानचा भारतावर आरोप, म्हणाले दहशतवादाला प्रोत्साहन देतो!
उद्यापासून आयपीएलचे बिगुल वाजणार!
जालना जिल्ह्यात बेकायदेशीररित्या दिलेले ३५९५ जन्म प्रमाणपत्र रद्द
वीजपुरवठा खंडित झाल्याने लंडनमधील हीथ्रो विमानतळ बंद
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होऊ शकते का?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले, नाही. तुमचे लाडके लाडके ठाकरे कोण?, उद्धव ठाकरे की राज ठाकरे?, असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर फडणवीस म्हणाले, ठाकरे अशे आहेत की त्यांना आपण लाडकं म्हणायचं आणि त्यांनी आपल्याला दोडकं म्हणायचं, त्यामुळे यामध्ये आपण काय पडायचं, पण एक खरं सांगतो, गेल्या ५ वर्षांमध्ये माझा उद्धव ठाकरेंसोबत काहीच संबंध राहिलेला नाही, माझा राज ठाकरेंसोबतच संबंध राहिलाय. उद्धव ठाकरेंनी संबंध तोडून टाकले, म्हणजे मारामारी नाहीय, समोर आलो की आम्ही चांगले बोलतो, नमस्कार करतो, पण उद्धव ठाकरेंसोबत संबंध नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
राज्यात महायुतीचे सरकार असून दोन उपमुख्यमंत्री आहेत तर लाडके उपमुख्यमंत्री कोण, अजितदादा की एकनाथ शिंदे?, असाही प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. यावर त्यांनी उत्तर देत म्हटले, दोघेही माझे लाडके आहेत आणि मी पण त्यांचा लाडका आहे. त्यामुळे आम्ही लाडके उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आहोत.