27 C
Mumbai
Monday, December 16, 2024
घरराजकारणमुंबई महापालिकेत वाहते भ्रष्टाचाराची गटारगंगा

मुंबई महापालिकेत वाहते भ्रष्टाचाराची गटारगंगा

Google News Follow

Related

शिवसेना शासित मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहते असा घणाघात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. रविवार, १२ डिसेंबर रोजी कांदिवली येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील आणि मुंबई महापालिकेतील सत्तधारी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे.

लोकनेते स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील कांदिवली पूर्व भागात राष्ट्रमाता जिजाऊ महिला आधार भवनाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कांदिवलीच्या आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तर याचवेळी आमदार अतुल भातखळकर यांच्या द्विवर्षपूर्ती कार्य अहवालाचेही प्रकाशन करण्यात आले.

हे ही वाचा:

संजय राऊत यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल

‘म्हाडा’ भरती परीक्षेत दलालांचा सुळसुळाट? आव्हाड म्हणतात…

…म्हणून पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक झाले?

‘म्हाडा’ ची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींचा संताप

या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. “मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहते आहे. जनतेच्या हक्काचा तुम्ही खाल्लेला पैसा बाहेर काढत नाही, तोवर भाजपा गप्प बसणार नाही. आई जिजाऊ यांनी शिवबांना घडविले नसते तर स्वराज्य कधीच प्राप्त झाले नसते, आज त्याच प्रेरणेतून या भ्रष्टाचारापासून मुक्तीचा संकल्प घेण्याची गरज आहे!” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा जी, खा. गोपाळ शेट्टी, योगेश सागर, भाई गिरकर, राजहंस सिंह आणि इतर नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा