28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारण'पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे समृद्धी महामार्ग'

‘पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे समृद्धी महामार्ग’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं व्यक्तव्य

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पार पडलं. यावेळी सभा स्थळी पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला संबोधीत केले आहे.

समृद्धी महामार्ग हा फक्त पंतप्रधान मोदी यांच्यामुळे शक्य झाला आहे. तसेच या मार्गासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्लेखनीय काम केले असल्याचे म्हणत फडणवीस यांनी मोदी आणि शिंदे यांचे कौतुक केले आहे.

ते म्हणाले, अशाप्रकारचा रस्ता तयार होऊ शकतो यावर खूप कमी लोकांना विश्वास होता. मात्र, एक व्यक्ती होत ज्याचा माझ्यावर पहिल्या दिवसापासून विश्वास होता आणि तो या संकल्पनेवर काम करत होता. त्या व्यक्तीचं नाव आहे त्यावेळचे माझ्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आजचे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ते पहिल्या दिवासापासून रस्त्यावर उतरून या महामार्गासाठी काम करत होते, असे म्हणत त्यांनी शिंदे यांचे भरभरून कौतुक केले आहे.

पंतप्रधान मोदींनी ताकद दिली म्हणून हे शक्य झाले आहे. खूप कमी लोकांनी हा महामार्ग बनवला जावा यासाठी पाठिंबा दिला. यामध्ये सुरुवातीपासून मला एकनाथ शिंदेंनी पाठिंबा दिला आहे. या महामार्गासाठी नऊ महिन्यात ७०० किलोमीटरच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आम्हला यश आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

पुढे फडणवीस म्हणाले, जमीन अधिग्रहण करण्यासाठी एकनाथ शिंदे स्वतः जनतेमध्ये जातं होते. विरोधकांनी विरोध केला. जमीन न मिळण्यासाठी प्रयत्न केले मात्र, एकनाथ शिंदे यांनी जमीन मिळवून दाखवली, असं म्हणत फडणवीसांनी शिंदे यांचं कौतुक केलं.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

ठाकरे गटातील नेत्याकडून शिंदे गटातील आमदाराचं कौतुक

‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले

एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

५० हजार करोड रुपयांचा मार्ग तयार झाला. नितिन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांनी मोठी भेट आपल्याला दिली आहे. तसेच पुढे नागपूर विमानतळ उद्घाटन सोहळ्यासाठी सुद्धा मोदी यांना निमंत्रण देणार असाही यावेळी फडणवीस यांनी म्हटले आहे. यासोबतचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली आणि गोंदियाला जोडण्याचासुद्धा प्रयत्न करत असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. महामार्गासारखे आमचे सरकार वेगाने सुरु आहे. आमचं डबल इंजिन सरकार वेगाने कामं करत आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा