25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणविरोधकांना अडकवण्यासाठी महाराष्ट्रात 'विशेष सरकारी' कट!

विरोधकांना अडकवण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सरकारी’ कट!

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनाचा मंगळवारचा दिवस चांगलाच वादळी ठरला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचे वस्त्रहरण केले आहे. विधानसभेत बोलताना फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कारभाराची लाखतरे टांगली. विरोधकांना खोट्या केससमध्ये अडकवण्यासाठी ठाकरे सरकारने कसे कुभांड रचले याचा कच्छाचिठ्ठा फडणवीस यांनी विधानसभेत खुला केला.

काय म्हणाले फडणवीस?
महाराष्ट्रात पुरोगामी संस्कृती आहे. आपण राजकीय विरोधक आहोत पण सशत्रू नाही. दक्षिणेच्या राज्यात दोन विरोधक एकमेकांसमोर उभे राहू शकत नाहीत. पण अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्राचे पोलिसदल कायद्याने आणि सुव्यवस्थेच्या काम करणारे पोलीस दल आहे अशी ख्याती पोलिस दलाची होती. पण आता त्या पोलीस दलाचा गैरवापर सत्तारूढ पक्षाकडून होत आहे. लोकशाहीत विरोधकांना संपवण्यासाठी पोलीस दलाचा गैरवापर सरकार करत असेल तर लोकशाहीला अर्थ उरणार नाही.

यावेळी फडणवीस यांनी एक पेनड्राईव्ह अध्यक्ष यांना सूपूर्त केला. या पेनड्राईव्ह मध्ये सरकार कशी कटकारस्थाने रचताय याचे व्हिडीओ पुरावे आहेत असे फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या विरोधात कसा कट रचून त्यांना अडकवण्यात आले याची पूर्ण कथाच त्यांनी मांडली. काही दिवसांपूर्वी महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

पुण्यातील मराठा शिक्षण प्रसारक मंडळात पाटील आणि भोईटे असे दोन गट आहेत. यात पाटील गटाने महाजनांच्या स्वीय सहाय्य्कने सांगण्यावरून भोईटे गटाच्या माणसाला किडनॅप केले आणि मग महाजन यांचा फोन आला की तू राजीनामा दे आणि आम्हाला त्या मंडळावर यायचं अशी खोटी केस तयार करण्यात आली. त्यात त्यांना मकोका लावण्यात यावा असा प्रयत्न करण्यात आला. पण कोर्टाने त्यांना दिलासा दिला. घटना घडली २०१८ मध्ये. त्याची केस दाखल झाली २०२१ मध्ये आणि या संपूर्ण प्रकरणात महाजन यांना अडकवण्यासाठी कुभांड रचले गेले.

हे ही वाचा:

अनिल परबांच्या सीएच्या घरीही आयकर विभागाचे छापे

महिलांवर अत्याचार करणाऱ्या तालिबानकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

RTO मधील ‘सचिन वाझे’ असलेल्या बजरंग खरमाटेच्या घरी आयकर विभागाची धाड

ईडीविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार केल्याचा संजय राऊत यांचा दावा

प्रवीण चव्हाण या इसम या सगळ्या मागचा मास्टरमाईंड असल्याचा दावा फडणवीसांनी केला. परवीन चव्हाण हे महाराष्ट्र सरकारचे विशेष सरकारी वकील होते. विशेष सरकारी वकिलांचे कार्यालय म्हणजे राजकीय विरोधकांच्या विरोधात षडयंत्र तयार करण्याचा अड्डा झाला आहे असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.

या कार्यालयात गिरीश महाजन यांच्या विरोधात खोटी केस कशी करायची, चाकू कसा पेरायचा, हे सगळं कुभांड रचले गेले. यात नंतर पोलीस आणि मंत्री सहभागी झाले. यात एफायर सरकारी वकिलांनी लिहिली, साक्षीदार तयार केले, जबान्याही त्यांनीच लिहील्या आणि कुभांड रचले. यात एक नेते जे पूर्वी भाजपमध्ये होते आणि आता मविआमध्ये आहेत अशा नेत्याचाही सहभाग होता असे म्हणत त्यांनी एकनाथ खडसेंवरही निशाणा साधला आहे.

या संपूर्ण घटनांचे सव्वाशे तासाचे व्हिडीओ फुटेज आपल्याकडे उपलब्ध असल्याचे फडणवीसांनी सांगितले. यापैकी काही फुटेज या सभागृहाची इभ्रत घालवणारे आहे त्यामुळे इथे सांगणेही शक्य नाही असा दावा त्यांनी केला. तर या संपूर्ण फुटेजमधले मटेरियल बघता त्यावरून २५ ते ३० वेब सिरीज तयार करता येतील असे फडणवीस म्हणाले. या व्हिडिओमध्ये गिरिध महाजन यांना अडकवण्याचा कट कसा रचला गेला हे स्वतः प्रवीण चव्हाण सांगत आहेत.

या संपूर्ण कारस्थानात आमदार अनिल गोटे हे देखील सहभागी असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. तर गिरीश महाजन यांच्या सोबतच भाजपचे इतर नेते जसे की देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, जयकुमार रावल अशा विविध नेत्यांना अडकवण्यात यावे यासाठीही कट रचण्या बाबत चर्चा झाल्याचे या व्हिडीओ फुटेजमधून स्पष्ट होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा