महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या दुटप्पी कारभारावर निशाणा साधला आहे. “ममता बॅनर्जींचे महाराष्ट्रात स्वागत होते आणि भाजपचे मुख्यमंत्री आले तर टीका होते” असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तर २०२४ साली पुन्हा एकदा मोदीच सत्तेत येणार असा विश्वास दर्शवला आहे. गुरुवार, २ डिसेंबर रोजी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या महाराष्ट्र दौर्याबद्दल प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, “आम्हाला विश्वास होताच पण आता विरोधकांच्या हालचालींवरून २०२४ ला पुन्हा मोदीजीच निवडून येणार हे त्यांना देखील पटलेले दिसते.”
काय म्हणाले फडणवीस?
मुंबई येथील भाजपा कार्यालयातून माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच टोले लगावले आहेत.
“मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशभरातले उद्योगपती मुंबई मध्ये राहतात. विविध राज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येत असतात आणि उद्योजकांना अपील देखील करत असता. पण माझा अनुभव असा आहे की बाकी कोणी फक्त अपील केले म्हणून महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जात नाहीत. पण म्हणून महाराष्ट्र राज्याच्या सरकारलाही नुसते बसून चालणार नाही. ‘कोणी बाहेर जाणार नाही’ असा नुसता विचार आपण करत बसलो आणि दुसऱ्या राज्यांनी जास्त सोयी सुविधा दिल्या तर उद्योग बाहेर जातात. गेल्या काही काळात आपण बघितलेलं आहे की महाराष्ट्रातील अनेक उद्योग हे इतर राज्यांमध्ये गेलेले आहेत. पण ममता बॅनर्जी यांची भेट म्हणजे त्यांचा तो द्या उद्योग आकृष्ट करण्याचा केवळ बहाणा होता. भाजपा विरोधात आघाडीची खलबतं करण्याचा त्यांचा मूळ अजेंडा होता असे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
उत्तर कोल्हापूरचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन
ममता बॅनर्जी यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान!
…आणि त्यावेळी अर्धवट बुद्धिवादी मूग गिळून गप्प होते
‘नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू’
२०२४ ला ही मोदीजी येणार आहेत. तेव्हा त्यांना हरवण्यासाठी काय करता येईल या करिता खलबतं चालली आहेत असे फडणवीस म्हणाले. तर असे प्रयोग २०१९ च्या वेळेही झाले. पण त्या प्रयोगांना यश आले नाही. लोकांनी मोदींवर विश्वास ठेवला आणि २०२४ पुन्हा लोक मोदीजींवरच विश्वास ठेवतील असे फडणवीसांनी सांगीतले.
तर मी मुख्यमंत्री होतो त्यावेळीही देशातल्या जवळजवळ सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी उद्योगाच्या संदर्भात उद्योजकांशी चर्चा करण्या करता यायचे. पण तो भाजपच्या राज्याचा मुख्यमंत्री असुदे किंवा बिगर भाजपा राज्यातील मुख्यमंत्री असुदे, प्रत्येक मुख्यमंत्र्याचा आम्ही सन्मानच केला. पण इथे मात्र ममतादीदी आल्या तर त्यांचे स्वागत आहे आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आला तर त्याच्यावर टीका होते ही दुटप्पी भूमिका आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
पण या सगळ्यात एक मात्र लक्षात येत आहे की आता काँग्रेसला बाजूला ठेवून बिगर काँग्रेस विरोधी पक्षाची एकी कारण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी करत आहेत. पवार साहेबांची त्याला साथ दिसते. त्याच्यावर काँग्रेसने रिएक्शन दिली आहे की आमच्याशिवाय लढले जाऊ शकत नाही. तेव्हा आता हा सामना त्यांचा अंतर्गत सामना आहे. तो अंतर्गत सामना पूर्ण झाल्यानंतर मग आमच्याशी कसं लढायचं हे ठरवा असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.
तर ममता बॅनर्जी आणि शरद पवार हे एकच भाषा बोलत आहेत असे फडणवीस म्हणाले. ममता बॅनर्जी यांचा स्वभाव लक्षात घेता त्या उघडपण बोलतात. तर शरद पवार यांचा स्वभाव बिटवीन द लाईन्स बोलण्याचा आहे. पण ते दोघे एकच गोष्ट बोलत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. आम्हीच खरी काँग्रेस आहोत आणि मूळ काँग्रेस आता संपली आहे हे सांगायचा त्यांचा प्रयत्न आहे. ममता बॅनर्जी यांनी आत्ता जी भाषा केली हे पवारांना सुरुवातीपासूनच वाटत आले आहे. पण राज्यातील परिस्थिती त्यांना अनुकूल नाही. म्हणून त्यांना काँग्रेसची साथ द्यावी लागते असा चिमटा फडणवीस यांनी काढला आहे.