देवेंद्र फडणवीसांनी दिली राम मंदिराला देणगी!

देवेंद्र फडणवीसांनी दिली राम मंदिराला देणगी!

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत निर्माण होणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी देणगी दिली आहे. राम मंदिर तिर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष श्री. गोविंद देव गिरीजी महाराज यांच्याकडे त्यांनी एक लाख एक रुपायांचा धनादेश सुपूर्द केला आहे.

रामजन्मभूमीत होऊ घातलेल्या भव्य राम मंदिरासाठी देशभर निधी संकलन कार्यक्रम सुरु असून त्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नेते, अभिनेते, उद्योजकही यात मागे नसून सढळ हस्ते राम मंदिरासाठी देणग्या देताना दिसत आहते, तसेच लोकांना निधी देण्यासाठी आवाहनही करत आहते. महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या महायज्ञात आपली एक समिधा अर्पण केली आहे. त्यांनी आपल्या आई आणि पत्नीसह श्री.गोविंद देव गिरीजी महाराज यांच्याकडे देणगीचा धनादेश दिला.

१५ जानेवारी २०२१ पासून भव्य राम मंदिर निर्माणसाठीच्या निधी संकलन कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. निधी संकलनाच्या या राष्ट्रीय कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचा महत्वपूर्ण सहभाग आहे. देशभरातील लाखो रामभक्त ५,२५,००० गावांमधून निधी संकलनाचे कार्य सुरु आहे. भाविकांना यथाशक्ती निधी देता येईल अशी सोय करण्यात आली असून, त्यांच्या सोयीसाठी १०, १००, १००० रुपयांची कुपन्स उपलब्ध आहेत. जर देणगीची रक्कम वीस हजारपेक्षा अधिक असेल तर देणगी धनादेशाच्या माध्यमातून स्वीकारण्यात येत आहे.

Exit mobile version