पोकळ आश्वासनं नको…शेतकऱ्याला तातडीची मदत द्या

पोकळ आश्वासनं नको…शेतकऱ्याला तातडीची मदत द्या

मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानावरून राज्यातील भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्ला केला आहे. ‘केवळ पोकळ आश्वासनं देऊ नका, शेतकऱ्याला प्रत्यक्ष आणि तातडीची मदत द्या’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात सध्या विविध भागात सध्या पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मराठवाड्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला दिसत आहे. मराठवाड्यतील अनेक बहगत पर्जन्य परिस्थिती पहायला मिळत आहे. तर या पावसामुळे शेतकऱ्यांचाही मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी शेतकरी हवालदिल झाला असून सरकारकडे मदतीच्या अपेक्षेने डोळे लावून बसला आहे. पण राज्य सरकारने अद्याप कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. यावरूनच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणारा भाजपा आक्रमक झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारला खडे बोल सुनावले आहेत.

हे ही वाचा:

लक्ष्मी येणार सोन्याच्या बिस्किटावरून!

मोदींच्या योजनेने भारावले बिल गेट्स! म्हणाले….

बँकेतून होणारे ऑटो डेबिट बंद! वाचा काय आहेत नवीन नियम

अमेरिकेचे लष्करी नेतृत्व आणि बायडन यांच्यातच मतभेद?

काय म्हणाले फडणवीस?
राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात ४३६ लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे. कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे. आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे.

Exit mobile version