बारामती येथे ‘नमो रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने बारामतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित असणार आहेत. या तिघांना शरद पवारांनी त्यांच्या निवासस्थानी खास भोजनाचे निमंत्रण दिलं होतं. राजकीय वर्तुळात याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, व्यस्ततेच्या कारणामुळे हे शक्य होणार नसल्याचं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे निमंत्रण नाकारलं आहे. या आशयाचे पत्र त्यांनी शरद पवारांना लिहंलं आहे.
पत्रात काय आहे?
“आपले पत्र मिळाले. भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण जाणताच की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. बारामतीतील भरगच्च कार्यक्रम लक्षात घेता आणि तदनंतर वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन, त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा असणार आहे. त्यामुळे आपल्या आग्रही निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही. पुन्हा आपले आभार.”
हे ही वाचा..
हिमाचलच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह भाजपावर खुश
“फुटलेल्या पक्षांनी त्यांची ताकद पाहूनच आघाडीत जागा मागाव्यात”
मुंबईत पोलीस निरीक्षकाविरोधात बलात्काराचा गुन्हा
स्वामी समर्थतर्फे व्यावसायिक कबड्डी ५ मार्चपासून
शनिवारी, २ मार्च रोजी बारामतीमध्ये नमो रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. बारामतीमध्ये शरद पवारांचे निवासस्थान असल्याने त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण दिले होते. पण व्यस्त कार्यक्रमांमुळे आपण या जेवणासाठी हजर राहू शकणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.