‘जर भोंगे वाजल्याने राग येत नाही तर हनुमान चालीसा लावल्याने का येतो’

‘जर भोंगे वाजल्याने राग येत नाही तर हनुमान चालीसा लावल्याने का येतो’

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. भोंगे वाजल्यानंतर राग येत नाही, तर हनुमान चालीसा म्हटल्याने का राग येतो? असा सवाल करत त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना धारेवर धरले आहे.

रविवार, १० एप्रिल रोजी कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या विधानसभा पोटनिवडणूकी संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी हिंदुत्वाचा मुद्दा धरून राज्यातील सत्ताधारी महा विकास आघाडी सरकारला त्यांनी खडे बोल सुनावले. सध्या राज्यभर गाजत असलेल्या भोंग्यांच्या मुद्द्यावरही फडणवीस यांनी भाष्य केले. हनुमान चालीसा या देशाची परंपरा आहे. हनुमान चालीसा म्हटल्याने काही लोकांना एवढा राग का येतो? जर भोंगे वाजल्याने राग येत नसेल, तर हनुमान चालीसा लावल्याने राग का येतो? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

तर ज्या क्षणी शिवसेनेच्या विभाग प्रमुखाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब म्हणत कॅलेंडर छापले, त्या क्षणापासून शिवसेना हिंदुत्ववादी राहिली नसून छद्म धर्मनिरपेक्षवादी बनली आहे असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला. आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. पण आमचा लांगुलचालनाला विरोध आहे. जर शिवसेनेचे नेते अजान स्पर्धा भरवत असतील तर प्रश्न उपस्थित होणारच असे फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

पोलिसांना चुकविण्यासाठी गो तस्करांनी गाईंनाच गाडीतून फेकले

‘श्रीरामांच्या आचार-विचारांचा जीवनात सर्वांनी अंगीकार करायला हवा’

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलचा भाजपा करणार सत्कार! पाच लाखांचा पुरस्कारही जाहीर

पंढरपूरमध्ये पांडुरंगाने आशीर्वाद दिला, कोल्हापूरमध्ये आई अंबाबाई देईल

तर यावेळी फडणीसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही लक्ष्य केले. नाना पटोले यांना भगव्याचा राग का आहे? त्यांना भगव्याचा तिटकारा का येतो? भगवा म्हटल्यावर त्यांना धर्मांधता का दिसते? इतर धर्माचा विषय येतो तेव्हा ते लांगुलचालन का करतात? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे शाहू-फुले-आंबेडकर यांचा विचार अडचणीत आला आहे असे मत फडवीसांनी मांडले.

Exit mobile version