पवारसाहेब किती हा भाबडेपणा?

पवारसाहेब किती हा भाबडेपणा?

शरद पवार हे सध्या पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर असून काल (१६ ऑक्टोबर) त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचंच नव्हते, पण मी त्यांना सक्तीने मुख्यमंत्री व्हायला भाग पाडले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच टोलेबाजी केली आहे. फडणवीसांनी थेट महाभारताचा दाखला देत साहेब! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती! असे मिश्किल भाष्य केले आहे.

‘द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले. कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा? साहेब! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती!,’ असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

सरकारचे नेतृत्व कोणी करावे, यासाठी आमच्याकडे दोन- तीन नावे आली होती. मात्र आमदारांच्या एका बैठकीत उद्धव ठाकरे हे माझ्या शेजारी बसले होते. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार असे विचारले गेले. त्यावेळी माझ्या बाजूला बसलेल्या उद्धव ठाकरेंचा हात मी स्वत: वर केला आणि हे नेतृत्व करतील असे जाहीर केले. त्यावेळी उद्धव ठाकरे नेतृत्व करायला तयार नव्हते. त्यांची हात वर करायची तयारी नव्हती आणि मुख्यमंत्री व्हायचीही इच्छा नव्हती. त्यांना अक्षरश: सक्तीने मी हात वर करायला लावला. मी त्यांचा हात वर केल्याने त्यांनी नेतृत्व स्वीकारले, असे पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हे ही वाचा:

‘ब्रिटीश खासदाराच्या हत्येमागे इस्लामी दहशतवादी’

अवघ्या २९ वर्षांचा क्रिकेटपटू अवि बरोटचे झाले निधन

‘स्वच्छता कामगारांसाठी बांधलेल्या घरांमध्ये १८४४ कोटींचा घोटाळा’

उल्हासनगरमध्ये पोलिसावरच चाकूने जीवघेणा हल्ला

त्यापूर्वी शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) मुंबईत पार पडलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले होते की, बाळासाहेबांना वचन दिले होते म्हणून मी मुख्यमंत्री झालो.

Exit mobile version