‘नवाब मलिक सरकारमध्ये राहावे यासाठी सगळी धडपड’

‘नवाब मलिक सरकारमध्ये राहावे यासाठी सगळी धडपड’

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत. आता नवाब मलिक यांचे डी गँगशी संपर्क असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, नवाब मलिक यांना वाचवण्यासाठी जेवढे प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. तेवढे प्रयत्न आरक्षणासाठी केले असते तर ओबीसी समाजाला न्याय मिळाला असता, असा घणाघात फडणवीसांनी केला आहे.

फडणवीस म्हणाले, दोन वर्ष हे ठाकरे सरकार इम्पेरिकल डेटा तयार करण्यासाठी काहीच करत नाहीत. मात्र त्यावेळी डी गँगशी संबंध असलेले नवाब मलिक मंत्रिमंडळात राहावेत यासाठी धडपड करत आहेत. नवाब मलिकांना वाचवण्यासाठी जी धडपड ठाकरे सरकारने केले आहेत. त्याच्यापेक्षा थोडे तरी कष्ट आरक्षणासाठी केले केले असते तर अर्ध आरक्षण राहील असते. अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

प्ले ओफ्सच्या जागेसाठी रॉयल चॅलेंजर्सने बदलले रंग

मी जिवंत आहे…हयात असल्याचे दाखविण्यासाठी शेतकऱ्याचा आटापीटा

जिथे पेट्रोल, तिथे इथेनॉल

राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेकडून अल्टिमेटम

दरम्यान, कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात नवाब मलिकांना ईडीने अटक केले असून मालमत्ता खरेदी आणि गैरव्यवहार प्रकरणात मलिकांचा संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. कुर्ल्यातील मोक्याची जमीन कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर एका पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर नवाब मलिकांना ईडीने २३ फेब्रुवारीला अटक केली होती.

Exit mobile version