पिंपरी- चिंचवडमध्ये देशातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत पार पडली. या शर्यतीचा मंगळवार, ३१ मार्च रोजी म्हणजेच आज शेवटचा दिवस झाला. त्यावेळी या स्पर्धेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी बैलगाडी शर्यतीला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. बैलगाडा शर्यत कधीच बंद होऊ देणार नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीवर निशाणा साधत फडणवीस म्हणाले, मुळशी पॅटर्न पाहिला का? बैल कधी एकटा येत नाही, तर तो येताना स्वतः बरोबर नांगरही घेऊन येतो. आणि मीही नांगर घेऊन आलो आहे. ज्याचा बैलगाडा शर्यतींना विरोध आहे त्यांच्यासाठी, असे विधान करत फडणवीसांनी इशारा दिला आहे.
आज शर्तीच्या शेवटच्या दिवशी बक्षीस वितरणासाठी खास देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी फडणवीस यांनी बैलगाडा मालकांशी संवाद साधला. भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली होती.
हे ही वाचा:
पीएफआयने केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान
तंबाखूमुळे प्रतिवर्षी १० लाख मृत्यू
कॅनडामध्ये पिस्तूल व्यापार मर्यादित करण्यासाठी नवीन विधेयक
काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी चिडून दिला राजीनामा
दरम्यान, देशातील या सर्वांत मोठ्या बैलगाडी शर्तीसाठी हजारोच्या संख्येने बैलगाडी मालकांनी भाग घेतला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात टोकन बुक होणारी ही इतिहासातील पहिली बैलगाडा शर्यत आहे. या शर्यतीसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील देखील लोक सामील झाले होते.