ठाकरे सरकारला ‘घोळ’ सरकार म्हणायचे का?

ठाकरे सरकारला ‘घोळ’ सरकार म्हणायचे का?

महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाची भारती परीक्षा रद्द झाल्यामुळे ठाकरे सरकार विरोधात टीकेची झोड उठली आहे. या विषयी बोलताना महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारला ‘घोळ’ सरकार म्हणायचे का? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. नवी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकार वर टीकास्त्र डागले आहे.

काय म्हणाले फडणवीस?
विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. वारंवार परीक्षा रद्द होत आहेत. या परीक्षेच्या संदर्भात तर स्वतः मंत्री महोदयांनी फेसबुकच्या माध्यमातून सांगितले की कुठलीही परीक्षा रद्द होणार नाही. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्यामुळे सगळे विद्यार्थी निर्धास्त राहिले. पदरचे पैसे खर्च केले आणि विद्यार्थी केंद्रावर आल्यानंतर आता आदल्या रात्री त्यांना समजते की परीक्षा रद्द झाली. या सरकारचे काय चाललंय समजत नाही. परीक्षा कधी घेतात? कधी रद्द करतात? याचे कुठलेही टाईम टेबल नाही. ताळतंत्र नाही.

ज्याप्रकारे प्रवेश पत्र देण्यात आले आहे. त्यातही घोळ आहेत. कोणाला उत्तर प्रदेश मधील प्रवेश पत्र, वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश पत्र दिली गेली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात मोठे कन्फ्युजन निर्माण झाले आहे.

हे ही वाचा:

योगी सरकारची लसीकरणात कोटी कोटी उड्डाणे

मर्केल यांच्यानंतर जर्मनीच्या चॅन्सेलर कोण?

पाकिस्तान, तात्काळ पीओके सोडा!

अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाप्रमाणेच ऑलिम्पिक संघटनेत दोन-दोन वर्षे खजिनदार

मला मिळालेल्या माहितीनुसार काही दलालही बाजारात आले असून या पदांकरिता पाच लाख दहा लाख रुपये गोळा करण्याचे काम सुरू आहे. हे अत्यंत गंभीर आहे. सरकारने या संपूर्ण प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. वारंवार विद्यार्थ्यांचे नुकसान सुरू आहे ते सरकारने थांबवले पाहिजे अन्यथा या विरोधात आम्ही आंदोलन करू असा इशारा फडणवीसांनी दिला आहे. या सर्व प्रकरणात चौकशी झाली पाहिजे. हे दलाल नेमके आहेत? हे समोर आले पाहिजे आणि विद्यार्थी याबाबत तक्रार करताना दिसत आहेत असे फडणवीस म्हणाले.

या परीक्षेत जो कोणी घोळ करत असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. सरकार आपल्या जबाबदारीतून हात झटकू शकत नाही. किती वेळा घोळ करायचे? घोळच घोळ सुरू आहे. या सरकारला ‘घोळ’ सरकार म्हणायचे का? असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

Exit mobile version