28 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारणफडणवीसांनी फोडला दुसरा बॉम्ब! 'न्यूज डंका' च्या हाती एक्सक्ल्युझिव्ह ध्वनिफीत

फडणवीसांनी फोडला दुसरा बॉम्ब! ‘न्यूज डंका’ च्या हाती एक्सक्ल्युझिव्ह ध्वनिफीत

Google News Follow

Related

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सध्या रोज दिवाळी होताना दिसत आहे. कारण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सरकार विरोधात रोज नवे बॉम्बस्फोट करताना दिसत आहे. आज म्हणजेच सोमवार, १४ मार्च रोजी फडणवीसांनी असाच एक गौप्यस्फोट केला आहे. वक्फ बोर्डावर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या माणसांची नियुक्ती करण्यात आल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. तर या संदर्भातही एक पेन ड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्त केला आहे.

फडणवीस आज नवीन बॉम्बस्फोट करणार असल्याची चर्चा गेले दोन दिवस सुरु होती. त्यानुसार त्यांनी एक नवा पेनड्राइव्ह आपल्या पिटाऱ्यातून काढला आहे. यात मोहम्मद अर्शद खान आणि डॉ. मुदसैर लांबे अशी दोन मुख्य पात्र आहेत. यापैकी डॉ. मुदसैर याला नवाब मलिकांनी वक्फ बोर्डावर नियुक्ती केल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. ही दाऊदची माणसे असल्याचा घणाघात फडणवीसांनी केला आहे.

यापैकी डॉ. लांबे याच्यावर बलात्काराचे आरोप झाले आहेत असे फडणवीस म्हणाले. डॉ. लांबे याने एका मुलीला लग्नाचे आश्वासन दिले. तिच्या पतीने तिला घटस्फोट दिला होता. या महिलेच्या पतीच्या विरोधात डॉ. लांबेनी चोरीची तक्रार केली. तो तुरुंगात गेला. डॉ. लांबे आणि अर्शद खान या दोघांमध्ये झालेला संवाद फडणवीसांनी विधिमंडळात वाचून दाखवला. या संवादात वक्फ बोर्डाच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे याची चर्चा आहे. तर आपले दाऊदसोबत संबंध असल्याचा कबुली जबाब पण आहे.

हे ही वाचा:

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला!

फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही आरोपी म्हणून नाही

मविआ सरकारचे धोरण म्हणजे, ‘दुसऱ्याला लेकरं झाली तर प्रोत्साहन आम्हीच दिलं

दहशतवादाशी संबंधित ८१ जणांना सौदी अरेबियात फाशी

या संवादात लांबे म्हणतो “मेरा प्रॉब्लेम क्या है मालूम…मेरे ससूर दाऊद कें राइट हँड थे और मेरा रिश्ता हसिना आपा ने कराया था. मेरे तरफ से सोहेल भाई थे और वहाँ सें हसिना आपा थी. हसिना आपा याने दाऊद की बहन. हसिना आपा और साथ में इक्बाल कासकर की वाईफ. याने दाऊद की भाभी. जरा भी कुछ हुआ तो बात वहाँ तक पहुँचती है,” त्यामुळे या संवादातून डॉ. लांबे स्वतःच दाऊदसोबतचे संबंध उघड करत आहे.

तर पुढे अर्शद खान असे सांगतो की अन्वर नावाचे त्याचे काका दाऊद सोबत होते. जे मुंबई सांभाळायचे तर लांबे याचे सासरे संपूर्ण कोकण पट्टा बघायचे. याच संभाषणात डॉ. लांबे अर्शद खानला म्हणतात तुम अभी वक्फ के काम में लग जाओ. अभी अपने पास पॉवर है. अभी पुरे वक्फ के काम सुरू करो. पैसे कमाने की सेटिंग करो. आधा तुम्हारा, आधा मेरा. यावर अर्शद म्हणतो मै अपना आदमी लेके आऊंगा, मै खुद तुम्हारे साथ बैठूंगा.

हे सारे संभाषण आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वाचून दाखवले आहे. पण न्यूज डंकाच्या हाती या संभाषणाची एक्सक्ल्युझिव्ह ध्वनिफीत हाती लागली आहे. ही ध्वनिफीत तुम्ही ऐकू शकता एक्सक्ल्युझिव्हली न्यूज डंकाच्या युट्युब चॅनलवर. संध्याकाळी ७ वाजता आम्ही ही ध्वनिफीत प्रदर्शित करत आहोत

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा