29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणनाशिक महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवा

नाशिक महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकवा

Google News Follow

Related

नाशिक महापालिकेवर पुन्हा भाजपाचा भगवा फडकवायचा आहे असा निर्धार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. छत्रपतींचा भगवा सुरक्षित ठेवायची जबाबदारी फक्त भारतीय जनता पार्टीची आहे. काही जण भगवा मिरवतायत पण पाठीमागे कोणाकोणासमोर जातायत हे सर्वाना माहित्ये असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला आहे. “त्यामुळे तो भगवा पुन्हा फडकवायची आणि त्याचे रक्षण करायची जबाबदारी आपल्यावर आली आहे” असे फडणवीस म्हणाले.

मी म्हणालेलो नाशिकमध्ये आम्हला आशीर्वाद द्या मी महापालिका दत्तक घेईन. दत्तक घेईन याचा काहींना गैरसमज असा झाला की महापालिका चालवायची आणि मलाई खायची. पण आमचा दत्तकचा अर्थ वेगळा आहे. महापालिका ही तिथल्या अधिकार्यांनाही चालवली पण जिथे अडेल तिथे आम्ही मागे ठामपणे उभार राहू आणि देशभरातल्या सगळ्या योजना नाशिकमध्ये आणू आणि राबवू.

हे ही वाचा:

बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची कर्नाटकमध्ये हत्या

राणेंच्या ‘अधिश’वर पुन्हा महापालिकेचं पथक दाखल  

झारखंड सरकारचे उर्दू प्रेम उफाळले; भोजपुरी, माघी भाषा वगळल्या

लालूप्रसाद यादवांच्या शिक्षेवर आज सुनावणी

नाशिक महापालिकेवर भगवा फडकावल्यावर मला मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांचाच कालावधी मिळाला पण या काळात देशभरातील योजना नाशिकमध्ये आणायचा आणि राबवायचा प्रयत्न केला. नाशिकमध्ये पायाभूत सुविधा आणि दळणवळणाच्या सुविधांचा विचार करता आपण निओ मेट्रोची योजना राबवली आणि ही योजना पथदर्शी ठरली असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे केंद्र सरकारने निर्णय घेतला की आता या लोकसंख्ये इतकी महापालिका असलेल्या ठिकाणी नाशिकसारखी निओ मेट्रो चालवली जाईल. यातून नाशिक पॅटर्न तयार झाला असे फडणवीस म्हणाले आहेत.

शहरात एवढी कामे झाली कारण आम्हाला राज्य हे दलाली खाण्यासाठी नाही तर लोकांची कामे कारण्यासाठी हवं असतं असा टोला फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. नाशिक महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना फडणवीस यांची ही सभा चांगलीच महत्वाची मानली जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा