मराठवाड्याची दुष्काळमुक्ती हेच उद्दीष्ट

मराठवाड्याची दुष्काळमुक्ती हेच उद्दीष्ट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त नांदेडमध्ये ध्वजारोहण करत शहिदांना मानवंदना दिली. या दिनानिमित्त नांदेडमध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरुन काढून मराठवाड्याला राज्यात प्रथम क्रमांकावर नेऊ, मराठवाड्याला लवकरच दुष्काळमुक्त करु, अशा घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीसांनी केल्या आहेत.

मुक्तिसंग्रामात ज्यांनी प्राणांची आहुती दिली अशा नाम, अनाम स्वातंत्र्यवीरांना सलाम करण्याचा आजचा दिवस आहे. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, याचा कधीही स्वैराचारात परिवर्तन होता कामा नये. आता जी नवीन राष्ट्राची निर्मती करत आहोत, त्यामध्ये मराठवाडा मागे राहणार नाही. महाराष्ट्रासोबत मराठवाड्याला विकासाच्या बाबतीत अव्वल क्रमांकावर नेण्याचा प्रयत्न करू. मराठवाड्याचा राहिलेला विकास आता भरून काढू, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

हे राष्ट्र स्मारकांचे!

७० वर्षानंतर चित्ते आले भारतात, पंतप्रधान मोदींनी काढले फोटो

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

‘जन धन’ नावाचा चमत्कार!

पुढे फडणवीस म्हणाले, मराठवाड्यात यंदा चार ते पाच वेळेस अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली आहे. शासनाने साडे सातशे कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. तीन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सोबतच नांदेड ते जालना मार्गही लवकर पूर्ण होणार आहे. या मार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या मार्गामुळे नांदेड मुंबईच्या अधिक जवळ येणार असून, यामुळे उद्योजक आणि नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

Exit mobile version