‘पाच वर्षाची काम अडीच वर्षात करणार’

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभात फडणवीस कार्यकर्त्यांशी बोलत होते.

‘पाच वर्षाची काम अडीच वर्षात करणार’

राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना झाला. मात्र, या सरकारकडे अडीच वर्षाचा कालावधी आहे. त्यानंतर २०२४ ला लोकसभा निवडणुका होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसंदर्भातच कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. आपल्याकडे आता अडीच वर्षांचा कालावधी आहे, त्यामुळे या काळात पाच वर्षांची काम करायची आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभात फडणवीस कार्यकर्त्यांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, आता राज्यात आपलं सरकार आलं आहे. मात्र याआधी आपल्याकडील अडीच वर्षे निघून गेली आहेत. आता या अडीच वर्षात आपल्याला पाच वर्षाची सर्व कामे करायची आहेत. महाराष्ट्राची जी घडी विस्कळीत झाली होती ती घडी पुन्हा बसवायची आहे. ज्या महाराष्ट्रात भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचारांची मालिका सुरु होती. ती मालिका थांबवून पुन्हा एकदा महाराष्ट्राला योग्य मार्गावर आणण्याचा आपला प्रयत्न आहे.

मागचे सरकार बळीराजावर आपत्ती आली तर सरकार मदतीची फक्त घोषणा करायचे पण निधी देत नव्हते. मात्र आता आपलं सरकार आलेलं आहे आता सर्व अन्याय दूर करायचे आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपचा मोठा विस्तार होईल, असा विश्वासही फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जामंत्री असताना त्यांनी या खात्याला पूर्ण न्याय दिला होता. आता प्रदेशाध्यक्षपदालाही ते न्याय देतील असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Exit mobile version