27 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरराजकारणउद्धवजी, लक्ष द्या, एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंबे आर्थिक संकटात आहेत!

उद्धवजी, लक्ष द्या, एसटी कर्मचाऱ्यांची कुटुंबे आर्थिक संकटात आहेत!

Google News Follow

Related

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून मांडली व्यथा

एसटी कर्मचाऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीवर बोट ठेवत त्यांना तातडीने दिलासा द्या, अशी मागणी भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी पत्रात म्हटले आहे की, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नसल्याने अनेक कुटुंबे प्रचंड आर्थिक संकटात आहेत. कुटुंबाचे अर्थचक्र संकटात सापडल्यामुळे नाईलाजाने एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्येसारखए पाऊल उचलावे लागत आहे. अहमदपूर, तेल्हारा, शहादा, कंधार, साक्री याठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

फडणवीस यांनी पुढे नमूद केले आहे की, गेल्यावर्षीही जळगाव येथे वाहक मनोज चौधरी व रत्नागिरी येथे पांडुरंग गडदे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंर आपल्याशी पत्रव्यवहार केला होता. पण नाशिक आणि इतर भागात आत्महत्यांचे सत्र सुरूच राहिले. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे बेडसे या एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करताना लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत वेतन मिळत नसल्याने आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट लिहून ठेवले आहे. असे असताना परिस्थिती नीट न हाताळता संताप व्यक्त करणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या घटनेने राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

हे ही वाचा:

आता नव्या उत्पादनांचीही होणार परदेशवारी

अमेरिकेच्या रॉकेटने काबुल विमानतळावरील अनर्थ टळला

एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे!

‘या’ शिवसेना खासदारावर ईडीचे छापे

फडणवीस यांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, माझी आपल्याला विनंती आहे की, एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथांकडे तातडीने हस्तक्षेप करत लक्ष द्यावे आणि वेतनाच्या समस्येवर तोडगा काढावा. केवळ कर्मचारीच नाहीत तर त्यांचे कुटुंबीयदेखील प्रचंड मानसिक व आर्थिक तणावाखाली आहेत. त्यामुळे आपल्या स्तरावर या गंभीर प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करावी.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा