पावसाळी अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांच्या उत्तरावरून संताप व्यक्त करत अशी उत्तरे चालणार नाहीत, असे सुनावले.
सभागृहाबाहेर पायऱ्यांवर भाजपा शिवसेना आमदार आणि राष्ट्रवादीचे आमदार एकमेकांना भिडल्यामुळे वातावरण तप्त झालेले असताना सभागृहात फडणवीस यांनी संताप व्यक्त केला. मुद्दा होता तो भाजपाचे लातूरचे आमदार अभिमन्यू पवार यांनी जिल्ह्यातील शेती पंपांना अखंडित वीज पुरवठा करण्याबाबत प्रश्न विचारला. त्याला लेखी उत्तर देताना त्यात हे खरे नाही, प्रश्न उद्भवत नाही अशी उत्तरे देण्यात आली. त्यावर देवेंद्र फडणवीस वैतागले. ते म्हणाले की, हे खरे नाही, प्रश्न उद्भवत नाही अशी उत्तरे देऊ नका. हे योग्य नाही.
हे ही वाचा:
अमोल मिटकरी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील विचारांचा काळा डाग
“सिनेडब्ज” बहुभाषिक चित्रपटासाठी पर्वणी…
“बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील दोषींचा सत्कार करणं चुकीचंच”
प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळाची करतो सुरुवात
संबंधित अधिकाऱ्यांना फडणवीस यांनी झापले. अशा प्रकारची उत्तरे खपवून घेतली जाणार नाहीत. एखादी गोष्ट त्यातली खरी नसते पण त्या प्रश्नातील परिस्थिती खरीच असते. त्यामुळे एकूणच परिस्थिती खरी नाही, अशी भावना तयार होते. तेव्हा अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने उत्तर द्यायला हवे. अशा सूचनाही फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आमदार व मंत्री म्हणून ओळखले जातात. विविध विषयांचा त्यांचा दांडगा अभ्यास आहे. अशा स्थितीत त्रोटक उत्तरे देऊन पाने पुसण्याचा प्रकार त्यांना पसंत पडलेला नाही. त्यामुळेच अधिकाऱ्यांवर ते संतापले.