विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांच्या कोंकण दौऱ्यावर जाणार आहेत. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बुधवार १९ मे आणि गुरुवार २० मे असे दोन दिवस हा दौरा असणार आहे. या दौऱ्यादरम्यान चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागाला फडणवीस भेट देणार आहेत.
तौक्ते या चक्रीवादळाचा भारतातील किनारपट्टीलगतच्या राज्यांना फटका बसला आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीच्या भागालाही या वादळाचा फटका बसला असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक भागात या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. याच नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांचा कोकण दौरा करणार आहेत. बुधवार १९ मे रोजी सकाळी रायगड जिल्हा पासून त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. फडणवीसांच्या दौऱ्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असणार आहे. सुरवातीला ते रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जाऊन तेथील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. तर पुढे रोहा येथे जाऊन तिथे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. तर तिथून पुढे महाड येथे जाणार आहेत.
हे ही वाचा:
सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोहही करू शकते
मराठा आरक्षण: भाजपा नेत्यांनी पंतप्रधानांना भेटून बाजू मांडावी
काँग्रेस गिधाडांप्रमाणे प्रेतांवर नजर ठेवून आहे
कोरोनाला ‘इंडियन व्हायरस’ म्हणत चीनी देणग्यांची परतफेड
अशा प्रकारचा दौरा करण्याची फडणवीसांची ही पहिली वेळ नसून गेल्या वर्षीही जेव्हा निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला होता तेव्हाही फडणवीसांनी अशाच प्रकारे दौरा केला होता. तर तिकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून असतात असा त्यांच्यावर आरोप विरोधक करत असताना विरोधी पक्ष नेत्यांचे दौरे करणे यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टीका होण्याची शक्यता आहे.