महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शर्जिल उस्मानीच्या विषयावरून फडणवीसांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सत्तेसाठी आणखीन किती लोकांना वाचवणार उद्धवजी?’ असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
हिंदूविरोधी गरळ ओकणारा जिहादी विचारांचा तरुण शर्जील उस्मानी याचा पुणे पोलिसांकडून जबाब नोंदवण्यात आला. बुधवारी १० मार्चला शर्जील उस्मानी पुणेतील स्वारगेट पोलीस ठाण्यात हजर झाला. ३० जानेवारी रोजी पुणे येथे आयोजित एल्गार परिषदेत उस्मानी वक्ता होता. यावेळी आपल्या भाषणात ‘हिंदू समाज सडलेला आहे’ असे आक्षेपार्ह वक्तव्य उस्मानी कडून करण्यात आले होते. यावरूनच देवेंद्र फडणवीस आक्रमक झालेले दिसून आले.
हे ही वाचा:
मथुरा, काशी आणि घुबडांचे चित्कार
कोणाच्या सांगण्यावरून सचिन वाझेने स्फोटकांनी भरलेली गाडी ॲंटिलियासमोर ठेवली
शरद पवारांनीच अनिल देशमुखांची हकालपट्टी करावी- किरीट सोमैय्या
“आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’ प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला. आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले?” असा सवाल फडणवीसांनी केला आहे.
आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्यात असेल तर त्याच्या मुसक्या आवळून शोधून आणणार म्हणजे आणणारच’❗️
प्रत्यक्षात काय, तो येऊन गेला, जबाब देऊन गेला.
आणि महाविकास आघाडी सरकारने प्रत्यक्षात काय केले❓#SharjeelUsmani— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 16, 2021
उस्मानी विरोधातल्या तक्रारीत २९५ अ या कलमाचा समावेश असतानासुद्धा मूळ एफआयआयआर मध्ये ठाकरे सरकारने विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे भारतीय दंड संहितेचे हे कलम जाणीवपूर्वक लावले नाही असे फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
मूळ तक्रारीत भादंविचे 295 अ कलम समाविष्ट असताना सुद्धा एखाद्या विशिष्ट धर्माला लक्ष्य करण्यासाठी लावले जाणारे हे कलम पद्धतशीरपणे एफआयआरमधून वगळले गेले.
लावले ते कलम 153 अ, जे विविध घटकांमध्ये शत्रूत्त्व निर्माण होईल, अशा विधानांसाठी लागते.#SharjeelUsmani— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 16, 2021
उस्मानी विरोधात ‘न्याय व्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा’विरोधात युद्ध पुकारण्यासाठी 124 अ या कलमा अंतर्गतसुद्धा गुन्हा दाखल व्हायला हवा होता, पण प्रत्यक्षात उस्मानीला जामिन मिळावा यासाठी मदत केली जात आहे. असे फडणवीसांनी म्हटले आहे.
खरे तर एफआयआर 295 अ, 153 अ या दोन्ही कलमांतर्गत असायला हवा होता. ‘न्यायव्यवस्था आणि सरकारी प्रशासनतंत्रा’विरोधात युद्ध पुकारण्यासाठी 124 अ हे सुद्धा कलम लावायला हवे होते. पण, प्रत्यक्षात करताहेत जामीन मिळण्यासाठी मदत❗️
अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार मा. उद्धवजी❓— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 16, 2021