देवेंद्र फडणवीस यांची चौफेर घोडदौड

देवेंद्र फडणवीस यांची चौफेर घोडदौड

भाजपाचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या ज्या ठिकाणी निवडणुकीत लक्ष घालतात तिथे ते यशस्वीच ठरत असल्याचे चित्र तयार झाले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत तिसरा उमेदवार निवडून आणण्यात फडणवीसांची चाणक्यनीती कामी आली. त्यामुळे धनंजय महाडिक विजयी ठरले.

गोवा विधानसभेच्या निवडणुकीत फडणवीस यांच्या रणनीतीचा प्रत्यय आला. ही निवडणूक जाहीर झाल्यावर प्रभारी म्हणून फडणवीस यांनी तिथे ठाण मांडले होते. उत्पल पर्रिकर यांनी बंड केल्यावर भाजपाच्या चिंता वाढल्या असे म्हटले जाऊ लागले पण छोट्या पक्षांना सोबत घेऊन त्यांनी योग्य गणित मांडले. त्यामुळे गोव्यात भाजपाने काँग्रेसचे सत्तेचे स्वप्न उद्धवस्त केले.

बिहारमध्येही फडणवीस हे प्रभारी होते. तिथेही त्यांनी स्थानिक मुद्दे लावून धरले. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे आव्हान असतानाही त्यांनी नितीशकुमार-भाजप यांच्या युतीला विजयी करण्याचे आवाहन केले. तिथे शेवटी भाजपाला विजय मिळविता आला. फडणवीसांच्या या यशस्वी वाटचालीमुळे त्यांचे राष्ट्रीय राजकारणातील वजनही वाढले.

हे ही वाचा:

“संजय राऊत ब्रह्मदेव आहेत काय? मतदान दिलं नाही हे कसं कळालं?”

पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करताना पोलीस उपायुक्तांची परवानगी आवश्यक

नवी मुंबईत इमारतीचा भाग कोसळला

“देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला जागा दाखवली”

 

राज्यसभा निवडणुकीतही फडणवीसांची हीच चाणक्यनीती यशस्वी ठरली. अपक्षांना व्यवस्थित आपल्यासोबत ठेवणे, कुठेही गडबड होणार नाही, याची काळजी घेणे, संयम, सावधगिरी बाळगणे, प्रतिस्पर्ध्यांना गाफिल ठेवणे अशा रणनीतीत फडणवीस यांनी महाविकास आघाडीला गुंतवून ठेवले आणि सगळी सूत्रे आपल्या हाती ठेवली. कोरोनामुळे आजारी असतानाही त्यांनी शांत न बसता संपर्काच्या माध्यमातून व्यूहरचना तयार केली. त्यामुळेच भाजपाचे धनंजय महाडिक विजयी ठरले.

Exit mobile version