‘आता हे सरकार २५ वर्षे चालेल’

‘आता हे सरकार २५ वर्षे चालेल’

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार बुधवार, २९ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा देताच कोसळले. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे आता विरोधी पक्षाचा म्हणजेच भाजपाच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर मुंबईच्या हॉटेलमध्ये जमलेल्या भाजपा आमदारांसोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली आहे.

“भाजपाच्या नेतृत्वाखाली पुढील अडीच वर्षांत सत्तेवर येणारे सरकार पुढील २५ वर्षे चालेल,” असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे गटातील ४० आमदारांचे आभार मानले. “अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची एकनाथ शिंदे यांच्या गटाने हिंमत केली, त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. येत्या अडीच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील प्रश्नांना न्याय द्यायचा आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे चर्चा करुन निर्णय घेतील,” असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.  तसेच उध्दव ठाकरे यांचा राजीनामा ही आनंद साजरा करण्याची गोष्ट नाही. त्यामुळे प्रतिक्रिया देताना आणि जल्लोष करताना भाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

हे ही वाचा:

मविआ सरकार कोसळलं; उद्धव ठाकरेंनी दिला राजीनामा

न्यायालयाची आणखी एक थप्पड, बहुमत चाचणी उद्याच घेण्याचे आदेश

“मदरशांमध्ये धर्माविषयी निंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद करायला शिकवले जाते”

“उदयपूर हत्या घटनेनंतर स्वा. सावरकरांचे विचार आठवतात”

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करेल, राज्याला लागलेले ग्रहण संपलं आहे.”

Exit mobile version