‘२४ महिन्यांत ३८ मालमत्ता! मुंबईला ते कसं लुटतात हे उघड झालं’

‘२४ महिन्यांत ३८ मालमत्ता! मुंबईला ते कसं लुटतात हे उघड झालं’

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. यशवंत जाधव यांची डायरी आयकर विभागाच्या हाती लागली आहे. या डायरीमध्ये यशवंत जाधव यांनी केलेल्या व्यवहाराच्या काही नोंदी समोर आल्या आहेत. नोंदीनुसार २ कोटी मातोश्रीला दिले. ५० लाखांचे घड्याळ मातोश्रीला दिले, अशा काही नोंदी या डायरीमध्ये आढळून आल्या आहेत. यावरून विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यशवंत जाधव आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“कोविड काळात मुंबई महानगरपालिकेत मोठा भ्रष्टाचार झाला हे सांगत होतो. कोविडच्या नावाखाली हे सगळे भ्रष्टाचार झालेले आहेत. २४ महिन्यांमध्ये ३८ मालमत्ता त्यांनी खरेदी केल्या आहेत. यावरूनच ते मुंबईला कसे लुटतात हे उघड झालं आहे,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. “आयकर विभाग या प्रकरणाचा योग्य तपास करत आहे आणि योग्य ती चौकशी आयकर विभागाकडून केली जाईल,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

यशवंत जाधव यांची डायरी आयकर विभागाच्या हाती लागल्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या डायरीमध्ये २०१८ ते २०२२ या कालावधीतील यशवंत जाधव यांनी केलेल्या व्यवहाराच्या काही नोंदी आहेत. नोंदीनुसार २ कोटी मातोश्रीला दिले. ५० लाखांचे घड्याळ मातोश्रीला दिले, अशा काही नोंदी या डायरीमध्ये आढळून आल्या आहेत. मात्र, या डायरीमध्ये मातोश्रीचा असलेला उल्लेख म्हणजे आपली आई असल्याचे यशवंत जाधव यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

चीनमधील त्या विमान अपघातात १३२ जणांचा मृत्यू

‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ

किरीट सोमय्या, निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार

चेन्नईला नमवून कोलकाताचा विजयी शुभारंभ

“आता मातोश्री म्हणजे माझी आई असं हे सांगत आहेत. पण, संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे की, कोण मातोश्री,” असा खोचक टोला भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. “यशवंत जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच जर आपल्या आईला इतके पैसे आणि महागडे घड्याळ दिले असेल तर धन्य ती माता,” अशी प्रतिक्रियाही अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

Exit mobile version