32 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरराजकारणसंभाजी ब्रिगेडशी युती म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी

संभाजी ब्रिगेडशी युती म्हणजे विनाशकाले विपरित बुद्धी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती करत असल्याची घोषणा केल्यानंतर त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर जहरी टीका करताना ही विनाशकाले विपरित बुद्धी अशा प्रकारचे पाऊल असल्याचे म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार बाहेर पडल्यानंतर शिवसेनेला मोठे खिंडार पडले. त्यानंतरही ही गळती थांबलेली नाही. ही गळती थांबविण्यासाठी आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जंग जंग पछाडत आहेत. त्यादरम्यान त्यांनी संभाजी ब्रिगेड या संघटनेशी युती करत असल्याची घोषणा केली.

त्यावर बोलताना फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करताना विनाशकाले विपरित बुद्धी म्हणजेच वाईट काळ सुरू असताना बुद्धीही भरकटते अशी अवस्था शिवसेनेची झाल्याची टीका केली.

हे ही वाचा:

चिंचपोकळीच्या चिंतामणीसाठी उसळला भाविकांचा सागर

सरन्यायाधीश लळीतांना आजोबा, वडिलांकडून मिळाला वकिलीचा वारसा

कुतुबमिनारपेक्षाही उंच सुपरटेक ट्विन टाॅवर पाडणार

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकलंत तर मिळतील अर्धा कोटी

 

संभाजी ब्रिगेड ही संघटना जातीयवादी संघटना असल्याचा आरोप केला जातो. ब्राह्मणद्वेषावर आधारित अशी वाटचाल या संघटनेची राहिलेली आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेत टीका करणे हे या संघटनेचे काम असल्याची टीका त्यांच्यावर होत असते. त्यामुळे अशा संघटनेशी शिवसेनेने नेमकी युती कशासाठी केली असा सवाल उपस्थित केला जात आहे.

यावेळी पत्रकारांनी फडणवीस यांना विचारले की, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानात शिंदे गट किंवा उद्धव ठाकरे यांना परवानगी दिली जाईल. त्यावर फडणवीस म्हणाले की, जे नियमात असेल तेच होईल. नियमाच्या बाहेर सरकार काम करणार नाही. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाच्या नेतृत्वात होईल, याबद्दल उत्सुकता ताणली जात आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा