मी सावरकर म्हणत सावरकर गौरव यात्रेचे आयोजन भाजपा शिवसेना युतीच्या माध्यमातून केले जात आहे. नागपूर येथील या सावरकर यात्रेत भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला.
ते म्हणाले की, बाप चोरला म्हणणारे उद्धव ठाकरे आपल्या वडिलांचे विचार विसरले. ते विचार घेऊन एकनाथ शिंदेंना मैदानात उतरावे लागत आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना काँग्रेस मुखपत्र शिदोरीत लेख छापला. माफीवीर सावरकर यांनी बलात्कार केला होता, ते समलैंगिक होते, असे अत्यंत घाणेरडे आरोप केले. पण उद्धव ठाकरे यांनी त्याचा साधा निषेधही केला नाही. उलट त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. राहुल गांधी महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांच्या गळ्यात गळे घालून चालत होते. म्हणून विचारावेसे वाटते की, काय होतास तू काय झालास तू?
हे ही वाचा:
१२ लाख डॉलर दंड भरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुटले!
जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ३० नेत्यांना दहशतवादी संघटनेकडून धमकी
पोलीस भरती -लेखी परीक्षेत डिव्हाइसच्या सहाय्याने देणार होता पेपर
फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणतात की, आम्ही हे सहन करणार नाही, आम्हाला हे चालणार नाही. काँग्रेसच्या काळातील भारतासारखे झाले आहे. पाकिस्तान बॉम्बस्फोट करायचे. तेव्हा आम्ही सहन करणार नाही म्हणून काँग्रेस सरकारकडून प्रतिक्रिया यायची. पुन्हा बॉम्बस्फोट झाला की, सहन करणार नाही. तिसऱ्यांदा असे घडले की, तीव्र शब्दांत निषेध करायचे. असेच बेगडी प्रेम आहे. सावरकरांना रोज शिव्या घालत आहेत पण तुम्ही म्हणता की, आम्ही सहन करणार नाही. आम्हाला चालणार नाही. कोण ऐकतंय तुमचं? सावरकरांना शिव्या देतायत आणि त्यांच्याच गळ्यात गळे घालत आहात. पण इतिहासात तुमचं नाव सावरकर विरोधकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांच्या यादीत घेतले जाईल.
फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला की, मला ते फडतूस गृहमंत्री म्हणाले. पण त्यांना सांगावे लागेल की, उद्धव ठाकरे फडतूस नही काडतूस हूँ मै, झुकेगा नही घुसेगा नही. सावरकरांबद्दल जे अपमान करतील त्यांच्याबद्दल यत्किंचितही माझ्या मनात आदर नाही.
ठाण्यात झालेल्या ठाकरे गटाच्या एका महिला कार्यकर्तीला झालेल्या मारहाणीनंतर उद्धव ठाकरे सपत्नीक ठाण्यात गेले होते. तिथे त्यांनी पत्रकार परिषद घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फडतूस आहेत असे म्हटले होते. त्याचा उल्लेख फडणवीसांनी केला.