‘२०१७ चे वचन पूर्ण करायला २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले’

‘२०१७ चे वचन पूर्ण करायला २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले’

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाग आलेल्या ठाकरे सरकारने मुंबईतील ५०० स्क्वेअर फूटांपर्यंतच्या घरांसाठी कर माफी केली आहे. या घोषाणेसंबंधी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, दिलेल्या वचनाची पूर्तता केली. यावरून विरोधी पक्षाने सरकारवर निशाणा साधला आहे. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. हिवाळी अधिवेशनातील एक व्हिडीओ ट्विट करत देर आए दुरुस्त आए, असे म्हणत खोचक टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये २८ डिसेंबर २०२१ रोजी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात ते कोरोना महामारीच्या कारणामुळे जनतेचे आर्थिक गणित बिघडलेले आहे त्यामुळे करात सूट द्यायला हवी यासंबंधी भाष्य करत आहेत. तेव्हा त्यांनी सरकारला तेव्हाचे शिवसेना पक्षप्रमुख आणि आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ५०० फुटापर्यंतच्या सदनिकांसाठी कोणताही कर घेणार नाही, असा शब्द दिला होता अशी आठवण करून दिली.

हे ही वाचा:

योगी आदित्यनाथ यांची जाहिरात कविता कृष्णन यांना झोंबली

आयसीसीच्या ‘या’ खास पुरस्कारासाठी स्मृती मानधनाला नामांकन

लॉकडाऊनच्या निर्णयावरून ठाकरे सरकारमध्येच संभ्रम?

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सरकारला आठवले वचन; ५०० स्क्वेअर फूटांपर्यंतच्या घरांना करमाफी

मात्र, त्यांनी पुन्हा हा शब्द देऊन ते वचन पूर्ण करायला हवे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर आज घेतलेल्या ठाकरे सरकारच्या निर्णयावर फडणवीस यांनी २०१७ चे वचन पूर्ण करण्यासाठी अखेर २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले, असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदारांनी आवाज उठवल्यावर ठाकरे सरकारने ही घोषणा केल्याचे म्हटले आहे. वचननाम्यातील आश्वासने पूर्ण करण्यासाठी दोन वर्षे का लागली असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे.

Exit mobile version