पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, २७ एप्रिल रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आर्थिक निर्णयांमध्ये ताळमेळ असायला हवा यावर बोलताना इंधन दरावरून काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले. यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचाही उल्लेख केला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. त्यानंतर विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “दोषारोप आणि जबाबदारी झटकणे यापेक्षा दुसरे काही करणार आहात का?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. “मुद्दा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा आहे आणि तुम्ही जीएसटीचा विषय घेऊन बसलात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या नफेखोरीची ‘पोलखोल’ करताच तुमचे अरण्यरुदन सुरू झाले,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
“जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळतच असतो, जुनीही थकबाकी मिळाली आणि उरलेली देण्याची मुदत जुलै २०२२ आहे. मग जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल- डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
जीएसटीचा निधी राज्याला नियमित मिळतच असतो, जुनीही थकबाकी मिळाली आणि उरलेली देण्याची मुदत जुलै 2022.
मग जीएसटीची थकबाकी मिळाल्यानंतर पेट्रोल-डिझेलवर आकारलेला अतिरिक्त कर ग्राहकांना परत करणार का❓#GST #Maharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 27, 2022
हे ही वाचा:
‘महाराष्ट्र, केरळ, बंगालने पेट्रोलवरचा कर कमी केला नाही’
रथ ओढताना विजेचा धक्का लागून ११ भाविकांचा मृत्यू
नरेंद्र मोदी यांनी दीव दमण आणि मुंबई येथील पेट्रोल किंमतींमध्ये किती तफावत आहे याचे उदाहरण दिले. त्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. “शेजारच्या दीव- दमणमध्ये १०३ रुपयांत पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रात १२० रुपयांना का? याचे उत्तर मिळालेच पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा आदर करत महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला तत्काळ दिलासा द्या,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शेजारच्या दीव-दमणमध्ये 103 रुपयांत पेट्रोल मिळते, तर महाराष्ट्रात 120 रुपयांना का❓
याचे उत्तर मिळालेच पाहिजे आणि दुसरे म्हणजे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आवाहनाचा आदर करीत महाराष्ट्रातील जनतेला, मराठी माणसाला तत्काळ दिलासा द्या ❗️#Maharashtra— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 27, 2022