31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारण“तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलंय”

“तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलंय”

छत्रपती शिवाजी पार्क मैदानातून देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

Google News Follow

Related

“शिवाजी पार्कवर बोलत असताना बाळासाहेबांची गर्जना आठवते. माझ्या तमाम हिंदू माता आणि भगिनींनो… हीच गर्जना उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐकायचो. पण, इंडिया आघाडीची बैठक झाली आणि त्यांनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलं,” अशी सणसणीत टीका देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरून उद्धव ठाकरे यांच्यावर केली. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्याच्या निमित्ताने महायुतीकडून शुक्रवार, १७ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानावर भव्य प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर आले होते. शिवाय राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीही हजर होते.

उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलं आणि ही शोकांतिका

मुंबईतील दादरचे छत्रपती शिवाजी पार्क हे शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हीच आठवण ठेवत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “शिवाजी पार्कवर बोलत असताना बाळासाहेबांची गर्जना आठवते. ते म्हणायेच, माझ्या तमाम हिंदू माता आणि भगिनींनो… हीच गर्जना आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐकायचो. पण, इंडिया आघाडीची बैठक झाली. त्यांनी सांगितलं हे चालणार नाही त्यामुळे ते बदला. तेव्हापासून त्यांनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडून दिलं. ही शोकांतिका आहे. बाळासाहेबांची सभा व्हायची, शिवशाहीचा भगवा झेंडा, कडवट हिंदू असं म्हटलं जायचं. आदर्श , शिवरायांचे मावळे असे शब्द ऐकायला मिळायचे. आता उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून बाप चोरला, घरी बसून काम करणार, गझनी, माझं कुटुंब माझी जबाबदारी या पलिकडे काहीही ऐकायला येत नाही,” असा सणसणीत टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

आम्ही विकासावर बोलतो; इंडी आघाडीवाल्यांनो तुमचं एक तरी काम दाखवा

“नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुती तयार झाली आहे. मुंबईने दहा वर्षात परिवर्तन पाहिलं आहे. तेचं परिवर्तन आम्ही भाषणात सांगतो. मुंबईचा चेहरा कसा बदललेला आहे हे सांगतो. अटल सेतू, गरिबांना मिळणारी घरे, धारावीचा विकास या मुद्द्यांवर भाष्य करतो. पण, इंडिया आघाडीवाल्यांनो तुम्ही काय सांगू शकता. तुम्ही एक तरी काम दाखवा,” असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी इंडी आघाडीच्या नेत्यांना दिले आहे.

पाकिस्तानचा झेंडा फटकवण्याची वेळ आल्यास राजकारणातून निवृत्ती घ्यायला हवी

“उद्धव ठाकरेंच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात. पाकिस्तानचा झेंडा फटकवण्याची वेळ आली तर राजकारणातून निवृत्ती घेतली पाहिजे. आता व्होट जिहादचे व्हिडीओ सुरू आहे. हे सांगत आहेत व्होट जिहाद करा. देशातील लोकांसाठी हा लोकशाहीचा यज्ञ आहे. नागरिक यात आपल्या मतांची समिधा टाकतील आणि नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवतील,” असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा:

काँग्रेसचा आता आमच्या ‘राहुलला सांभाळा’चा प्रयोग, सोनियांनी पदर पसरला

‘विदेश दौऱ्याचे तिकीटही बुक झाले, खटाखट-खटाखट’

“सपा, काँग्रेस सत्तेत आले तर, रामलल्ला पुन्हा तंबूत जाणार”

टी-२० वर्ल्डकप भारत-पाक सामन्यांचे तिकीट २ लाखात!

नरेंद्र मोदी एकीकडे कोविडची लस देत होते; दुसरीकडे उद्धव ठाकरे घोटाळे करत होते

“कोविडचा काळ असा होता की आपल्या नातेवाईकांशी लोक बोलत नव्हते. काय होईल याची चिंता होती. चारचं देशांनी लस तयार केली होती. त्यामुळे हे देश म्हणतील की, आधी आमच्या लोकांना लस देतो आणि मग तुम्हाला लस पुरवतो. हे जाणूनचं नरेंद्र मोदींनी शास्त्रज्ञांना एकत्र करून कोविडची लस भारतात तयार केली. १४० कोटी भारतीयांना ही लस दिली. नरेंद्र मोदी एकीकडे कोविडची लस देत होते. तेव्हा दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात खिचडीचा, रेमडिसिव्हीरचा, ऑक्सिजनचा घोटाळा सुरू होता. प्रेतावरचं लोणी खाणं म्हणजे काय असतं हे आम्हाला कळलं,” अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा