“ठाकरेंनी गडकरींना ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने अमेरिकेचा राष्ट्रपती करतो हे सांगण्यासारखं”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

“ठाकरेंनी गडकरींना ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने अमेरिकेचा राष्ट्रपती करतो हे सांगण्यासारखं”

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा नेते नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्याचे वक्तव्य केले होते. दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच महाविकास आघाडीत सामील होण्याची ऑफर दिली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना त्यांच्या ऑफरवर सणसणीत उत्तर दिले आहे.

दिल्लीच्या तख्तापुढे छत्रपती शिवाजी महाराज कधीच झुकले नव्हते. आताचा महाराष्ट्र तरी कसा झुकेल? काळी संपत्ती गोळा करणार्‍या कृपाशंकरसिंह यांना उमेदवारीच्या पहिल्या यादीत स्थान मिळाले. मात्र, भाजपा वाढविण्यात ज्यांची हयात गेली, त्या नितीन गडकरी यांचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. अहंकाराला लाथ मारा आणि महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची, अशी ऑफर त्यांनी गडकरी यांना दिली होती.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरींसारख्या नेत्यांना अशी ऑफर देणं म्हणजे गल्लीतल्या व्यक्तीने, मी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती करतो हे सांगण्यासारखं आहे. नितीन गडकरी हे महाराष्ट्रातल्या नागपूरमधून लढतात, ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पहिली यादी आली त्यात महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याचं नाव नव्हतं. महाराष्ट्राचा निर्णय झाला नव्हता, त्यामुळे आम्ही ती चर्चा केली नाही. महायुतीचा निर्णय होऊन महाराष्ट्रातल्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळी सर्वात आधी नितीन गडकरींचं नाव येईल. त्यामुळे मला वाटतं स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत,” अशी सणसणीत टीका देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

हे ही वाचा:

सुधा मूर्तींची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती

“मराठा आरक्षणाअंतर्गत होत असलेली भरती प्रक्रिया न्यायालयाच्या अधीन राहणार”

१० बस बदलल्या, वेगवेगळे कपडे घातले.. बेंगळुरू कॅफे बॉम्बस्फोट संशयितांची माहिती समोर!

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनात ‘उघडपणे’ शस्त्र बाळगण्यास परवानगी!

सुप्रिया सुळेंनी टीका केली ‘अब की बार गोळीबार सरकार’ यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सुप्रिया सुळेंना इतकंच विचारु इच्छितो जेव्हा मावळचा गोळीबार झाला तेव्हा कुणाचं सरकार होतं? ज्यावेळी राज्यातल्या ११३ गोवारींचा पोलीस लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला होता तेव्हा कुणाचं सरकार होतं? सुप्रिया सुळे आत्ता विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहेत. त्यामुळे त्या रोज अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत फार गांभीर्याने घेण्याचं काही कारण नाही.”

Exit mobile version