‘आम्हाला उद्घाटनाला बोलावलं नाही तरी चालेल, पण सर्व मेट्रो सुरु करा’

‘आम्हाला उद्घाटनाला बोलावलं नाही तरी चालेल, पण सर्व मेट्रो सुरु करा’

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आरे मेट्रो स्थानक येथे आज उद्घाटन होणार आहे. मात्र, या उद्घाटन सोहळ्याला राजकीय वळण मिळाले असून श्रेयवादाचे राजकारण सुरू आहे. दरम्यान या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेले नाही त्यामुळे या कार्यक्रमावर भाजपाने बहिष्कार टाकला आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भगवं तेज अनुभवायला मिळत असल्याचे फडणवीस म्हणाले. यंदाचे वेगळेपण असे आहे की एकीकडे श्री रामाची मिरवणूक काढत असताना, अयोध्येत श्री रामाच्या मंदिर प्रत्यक्ष निर्माण होत आहे. येत्या काळात नववर्षाचा दिवस श्री रामाच्या सानिध्यात अयोध्येत साजरा करता येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

त्यानंतर द्वेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रो प्रकल्प आणि उद्घाटन कार्यक्रम यावर भाष्य केले. “त्यांनी जरुर मेट्रोचे उद्घाटन करावे, माझ्या त्यांना सुभेच्छा आहेत. पण जनतेला माहित आहे की, दोन्ही मेट्रोचे काम मी सुरु केले आणि अतिशय वेगावे ते सुरु होते. या सरकारमध्येच मेट्रोचे काम रखडले होते. आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल, पण सर्व मेट्रो सुरु करा. मेट्रो ३ चा प्रश्न निकाली काढा,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

हे ही वाचा:

मोदी म्हणाले आगामी वर्षात सर्व मनोकामना पूर्ण होवोत

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झाला ‘ऐतिहासिक’ करार

श्रीलंकेत परिस्थिती चिघळली; आणीबाणी लागू

आर्यन खान प्रकरणातला पंच प्रभाकर साईल मृत्युमुखी

“सरकारने श्रेय जरूर घ्यावं पण अपश्रेयाचे भागीदार होऊ नये. सरकारने मेट्रो ३ चा प्रकल्प लवकर सुरु करावा. ९ महिन्यात आरे मधील कारशेडचे काम पूर्ण होऊ शकत आणि मुंबईतील सर्वात महत्त्वाची मेट्रो ३ सरकारने सुरु करावी. त्याही कार्यक्रमात आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Exit mobile version