मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी २३ डिसेंबर रोजी शिवसैनिकांशी संवाद साधताना युतीतली आमची २५ वर्षे सडली, अशी टीका भाजपवर केली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव्ह विसर भाषणात पाहायला मिळाला, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
२५ वर्षे युतीत सडलो, असे ते म्हणत आहेत. २०१२ पर्यंत बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले असे तुमचे म्हणणे आहे का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
हे ही वाचा:
‘मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे फक्त थयथयाट’
तस्लिमा यांनी सरोगेसीच्या मुलांना ‘रेडीमेड बेबी’ का असे संबोधले ?
‘ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत’
पोटात लपवल्या होत्या हेरॉईनच्या ३८ गोळ्या
तुमचा पक्ष जन्माला येण्यापूर्वी मुंबईत आमचे नगरसेवक आणि आमदार होते. १९८४ मध्ये तुम्ही भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवली. शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपसोबत असताना पहिल्या क्रमांकावर गेले आणि भाजपला सोडल्यावर चौथ्या क्रमांकावर गेले, असा टोला फडणवीस यांनी लागावला आहे. भाषणात तेच तेच मुद्दे असतात. शिवसैनिकांनाही आता भाषण पाठ झालं, अशी खोचक टीका फडणवीस यांनी केली आहे.
राम मंदिर हे मोदींच्या नेतृत्वात तयार होत आहे. तुम्ही साधा दुर्गाडी किल्ल्याचा आणि मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही. तुमचा हिंदुत्वाशी संबंध काय, असा सवाल त्यांनी केला. तुमचे हिंदुत्त्व केवळ कागदावर आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली. आम्ही बाळासाहेबांबद्दल नेहमी बोलतो त्यांना अभिवादन करतो. आमच्यासाठी ते वंदनीय आहेत. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन करणारे साधे ट्विटही केले नाही. तरीही तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात, अशी घाणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.