सामना आणि त्यांचे संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदलले आहेत. सोनिया, राहुल आणि प्रियांका हे त्यांचे केंद्रबिंदू आहेत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर आणि खासदार संजय राऊत यांच्यावर शरसंधान केले आहे.
सरकारची भूमिका ही लोकशाही विरुद्ध आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारच्या वतीने कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्व प्रयत्न केले मात्र तरीही सरकारने त्यांच्या बाजूने दोन पावले समोर यायला हवे ते सरकारकडून होत नाहीये, असेही फडणवीस म्हणाले. सरकारकडे संवेदना नाहीत. मेस्मा लावण्यापेक्षा चर्चेतून मार्ग काढावा असे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारच्या चुकीमुळे वाढले नारायण राणेंचे सुरक्षा कवच?
एटीएम पडले मागे; लोक करत आहेत घरबसल्या व्यवहार
चिडलेले शेतकरी शांत होऊन गेले! कंगनाने असे काय केले?
यशवंत जाधव यांच्यावर सोमैय्यांनी फेकला मनी लॉन्ड्रिंग आरोपाचा बॉम्ब
सामनामध्ये आज ममता यांच्यावर टीका करण्यात आली आहे त्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, सामना आणि त्यांचे संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदलले आहेत. सोनिया, राहुल आणि प्रियांका हे त्यांचे केंद्रबिंदू आहेत, असे फडणवीस म्हणाले.
एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भात सरकारची भूमिका लोकशाही विरोधी!
'मेस्मा'ऐवजी सरकारने चर्चेतून मार्ग काढावा.
सत्तेच्या अहंकारात इतके मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधीही पाहिले नाही.
जनता यांना कधीच माफ करणार नाही!
संभाजीनगर येथे माध्यमांशी संवाद…https://t.co/auGh8BM2Cy pic.twitter.com/TBhcW0FSN3— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2021
नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला होता आणि आज त्याच्याच वडिलांचा मृत्यू झाला यावर सत्ताधारी शिवसेनेकडून कोणताही नेता घटनास्थळी गेला नव्हता भाजपच्या नगरसेवकांनी लक्षात आणून दिल्यावर भेट देण्यात आली यावर फडणवीसांनी सत्तेच्या अहंकारात मदमस्त झालेले राज्यकर्ते यापूर्वी कधी पाहिले नाही असा टोला सरकारला लगावला.