28 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरराजकारण‘ठाकरे सरकार हे कोडगं सरकार आहे’

‘ठाकरे सरकार हे कोडगं सरकार आहे’

Google News Follow

Related

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज तोडणी प्रकरणावरून सरकारला चांगलच घेरलं होतं. हे सरकार सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज कापत आहे. दोन्ही कडच्या आमदारांनी त्याबाबतचा एल्गार विधानसभेत केला. अजितदादांनी मागच्या अधिवेशनात घोषणा केली मे पर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही. अधिवेशनातील आश्वासन का पाळलं जात नाही? असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. या मुद्द्यावर चर्चा करू म्हणून सांगितलं होतं. पण आज या कोडग्या सरकारने वेगळीच चर्चा केली.

सरकारला शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदना नाही. ठाकरे सरकार हे कोडगं सरकार आहे, असा घाणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. चर्चा कसली करता वीज जोडण्या तोडण्याचं काम थांबवा. कनेक्शन जोडून द्या. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही प्रश्न लावून धरू, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कालपर्यंत तुम्ही सभागृहात सांगत होता की न्यायालयात पिटिशन पेंडींग आहे. मात्र, आता ईडीची कारवाई योग्य असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. सरदार शहावली खान, सलीम पटेल यांच्याशी संगनमत करून मनी लॉन्ड्रिंग झालं आहे. यात सहभागी असलेल्या मलिकांचा राजीनामा कधी घेणार? आता जर राजीनामा घेतला नाही, तर हे सरकार दाऊदच्या दबावात काम करतंय हे स्पष्ट होईल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

नवाब मालिकांना न्यायालयाचा दणका; ईडीने केलेली कारवाई कायद्याला अनुसरूनच

राम गोपाल वर्मा म्हणतो काश्मीर फाईल्स नंतर ‘विवेक’वूड

अनेक राज्यांत ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त!

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदी योग्य; कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल

प्रवीण दरेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबद्दलही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. दरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं षडयंत्र सुरू आहे, असे ते म्हणाले. मजूर संवर्गातून दरेकरांनी अर्ज भरला होता. तो मागे घेतला. त्यानंतर ते अर्बन बँक संवर्गातून अर्ज भरून निवडून आले. तरी जाणीवपूर्व गुन्हा दाखल केला आहे. मजूर फेडरेशनचा अध्यक्ष किंवा सदस्य असणं हा गुन्हा असेल तर या महाराष्ट्रातील ९० टक्के मजूर फेडरेशनचे सदस्य आणि अध्यक्ष हे विविध राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्या सर्वांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. गुलाबराव देवकर हे सुद्धा मजूर फेडरेशनचे सदस्य होते. अनेक नावे आमच्याकडे आहेत. पण दरेकरांवर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा