‘महाविकास आघाडी सरकार हे दाऊदला शरण आलेलं सरकार आहे’

‘महाविकास आघाडी सरकार हे दाऊदला शरण आलेलं सरकार आहे’

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून पहिल्याच दिवशी हे अधिवेशन वादळी ठरत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ सुरू झाल्याने राज्यपाल अभिभाषण सोडून सभागृहातून निघून गेले. तर त्यापूर्वी भाजपा नेत्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सकाळी आंदोलन केले. त्यानंतर विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

हे दाऊद शरण सरकार असून इतिहासात प्रथमच असं होतंय की एखादे मंत्री तुरूंगात असताना राजीनामा घेतला नाही. मुख्यमंत्री याविषयावर गप्प का आहेत? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नवाब मलिकांनी दाऊदच्या बहिणीला मदत केली. मलिकांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय? नवाब मलिक यांचा राजीनामा येईपर्यंत शांत बसणार नाही. महाविकास आघाडी सरकार हे दाऊदला शरण आलेले सरकार आहे. राठोड, देशमुखांचा राजीनामा घेता पण मलिकांचा का घेत नाही? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हसिना पारकरला पैसे दिले आहेत, त्यातून नवाब मलिकांना अटक झाली आहे. हसिना पारकर ही दाऊदची बहीण आहे. दाऊदच्या बहिणीला पैसे देणे म्हणजे दाऊदला मदत करण्यासारखे आहे. दाऊदला समर्थन करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे,” अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हे ही वाचा:

अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा; या विषयांवर केली चर्चा

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात; हे मुद्दे गाजण्याची शक्यता

राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ; राज्यपाल सभागृह सोडून निघाले

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपा नेते किरीट सोमय्यांवर झालेले आरोप, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावरील कारवाई, केंद्रीय यंत्रणांचा वापर अशा अनेक मुद्द्यांवर हे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.

Exit mobile version