राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना विरुद्ध भाजप असे राजकीय युद्ध सुरू असतानाच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. भाजपचे महानगरपाकिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांच्या पंचवार्षिक कार्य अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षात शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला असून त्याची चौकशी करण्यात यावी. या चौकशीसाठी स्पेशल कॅग ऑडिट करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
प्रभाकर शिंदे यांनी शिवसेनेने केलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात सातत्याने आवाज उठवला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. गेल्या पाच वर्षात असलेल्या मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार केला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुंबई महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी स्पेशल कॅग ऑडिट करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाकरे सरकारमध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार पहायला मिळत आहे, त्यावरून वाटत नाही देशात इतका भ्रष्टाचार दुसरीकडे कुठे अजून पहायला मिळाला असेल, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. कोरोनाचा बहाना करून भाजपच्या नेत्यांना बोलू द्यायचे नाही. स्थायी समिती जाणीवपूर्वक ऑनलाईन घ्यायची आणि भाजप नेत्यांना म्युट करून टाकायचे, असे कारस्थान सुरू असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. निवडणुकीच्या काळात शिवसेना भावनिक साद घालून महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा घेऊन जनतेसमोर मते मागणार, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
हे ही वाचा:
… म्हणून विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटर अकाऊंट केलं डिऍक्टिव्हेट
सोमय्यांमुळे दमछाक; आता नारायण राणे
मिशन श्रीलंकासाठी भारतीय संघ जाहीर! कसोटी संघाचे नेतृत्वही रोहित शर्माकडे
शिवसेनेकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार होत आहे. हा भ्रष्ट्राचार दूर व्हावा यासाठी मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता येणे गरजेचे असल्याचे मत प्रभाकर शिंदे यांनी या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.