26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारण‘यांची मिलीजुली कुस्ती सुरू आहे आणि सगळे मिळून खेळत आहेत’

‘यांची मिलीजुली कुस्ती सुरू आहे आणि सगळे मिळून खेळत आहेत’

Google News Follow

Related

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी दाखवली आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात चांगल्याच हालचाली दिसून येत आहेत. एमआयएमच्या प्रस्तावानंतर भाजपचे नेते सातत्याने शिवसेनेवर टीकेची झोड उठवत आहेत. यावरूनच विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, “अजाण स्पर्धा भरवणार ते, जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिणार ते, त्यांचेच घटक पक्ष एमआयएम सोबत युती करायचा विचार करणार आणि आरोप ही हेच करणार. ही मिलिजुली कुस्ती आहे. ते सगळे मिळून खेळतायेत,” असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस हे आज मावळ तालुक्यात बैलगाडा शर्यतीला गेले होते. त्यांनी या शर्यतीत धावणाऱ्या बैलगाड्यांच्या नंबरचा आधार घेत महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार टोलेबाजी केली. “मी ठरवलं की नंबर एक  येतोच, मात्र महाविकास आघाडीचे नेते तीन मार्कशीट जुळवून पहिले आले,” असा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींची जपानच्या पंतप्रधानांना ‘कृष्ण पंखी’ भेट

आर आर आर चित्रपटाची टीम पोहोचली स्टॅच्यू ऑफ युनिटीला

अगदी लवकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलावर फसवणुकीचा गुन्हा

याआधीही देवेंद्र फडणवीस यांनी एमआयएमच्या प्रस्तावावरून शिवसेनेवर निशाणा साधला होता. भाजपाला हरवण्यासाठी हे सर्व एकत्र येत आहेत. पण कोणीही एकत्र आले तरी भाजपाला हरवू शकत नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एमआयएमशी युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा