‘शिवसेना इथे आले तर नाव महाराष्ट्राचं घेतील, पण काम मुघलांचं करतील’

‘शिवसेना इथे आले तर नाव महाराष्ट्राचं घेतील, पण काम मुघलांचं करतील’

देवेंद्र फडणवीस यांनी केला घणाघात

महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दादरा नगर- हवेलीत भाजप उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली होती.

‘शिवसेना दादरा नगर- हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर ५६ जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले, असे हे संधीसाधू आहेत. मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का?’ असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी सभेमध्ये बोलताना विचारला आहे. ‘ते इथे आले तर नाव महाराष्ट्राचं घेतील आणि काम मुघलांचं करतील’, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.

देशातील गरीब जनतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योजना केल्या. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ हे मोदींनी देशात यशस्वी करून दाखवले. गरीबांसाठी योजना तयार केल्या आणि त्यांची अंमलबजावणी केली. मोदींच्या सरकारमधून दिल्लीतून एक रुपया निघतो आणि तो गरीबांच्या खात्यात जातो. दादरा नगर-हवेलीतही प्रत्येकाला पक्की घरे दिली जातील. भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रमध्ये १० लाख घरे दिली आहेत.

हे ही वाचा:

मुंबईतून २४ किलो चरस जप्त; चार आरोपींना अटक

समीर वानखेडे बाजूला झाले तर फायदा कोणाचा?

‘भारतीय मुसलमानांनाही हवा होता पाकिस्तानचा विजय’…मंत्र्याने तोडले तारे

पाकिस्तान जिंकल्याच्या जल्लोषात शिक्षिकेने गमावली नोकरी!

मोदींनी घर, गॅस देताना कोणाची जात, धर्म, पंथ पाहिला नाही. आता मोदी आरोग्याची योजना गरीबांपर्यंत पोहोचवत आहेत. जे मागील ६० वर्षांत कधी दादरा नगर- हवेलीत पोहोचले नाहीत, ते सात वर्षात मोदींनी पोहोचवले. गरीबांच्या योजनांना मोदींनी प्राधान्य दिले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Exit mobile version