राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली सुरू असून औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात एक बैठक झाली असून या बैठकीत इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीसोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एमआयएमने जरूर महाविकास आघाडी सोबत जावं. भाजपाविरुद्ध लढण्यासाठी, भाजपाला हरवण्यासाठी हे सगळं चालू आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण महाराष्ट्रातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे आहे. आम्ही केलेली कामे आणि करत असलेली कामं जनता पाहत आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. कोणीही एकत्र आले तरी आता भाजपाला हरवू शकत नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
या सर्व प्रकरणात शिवसेनेची भूमिका काय असणार आहे याकडे विशेष लक्ष असेल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेनेने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विसरून जनाब बाळासाहेब ठाकरे यांना स्वीकारले आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेवढे चांगले आणि भल्याचे निर्णय शेतकऱ्यांसाठी तेवढे कोणीही घेतलेले नाहीत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
योगी आदित्यनाथ या दिवशी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ
रशियाने युक्रेनवर सहा क्षेपणास्त्रे डागली
ओमर अब्दुल्ला म्हणाले होते, काश्मिरी पंडितांच्या अत्याचारास मुस्लिम जबाबदार!
दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी जपानचे पंतप्रधान येणार भारतात
इम्तियाज जलील यांनी सांगितले की, “आमच्यावर आरोप होतात की, भाजप जिंकते ते आमच्यामुळे जिंकते. तर मी त्यांना ऑफर दिली की, जर तुम्हाला हे संपुष्टात आणायचं असेल तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? पण त्यावर ते काही बोलले नाहीत. कुणालाही आम्ही नकोय. फक्त मुस्लिमांची मते पाहिजेत. काँग्रेस, राष्ट्रवादीलाही मुस्लिम मते हवी आहेत ना या मग आमच्यासोबत.”