शरद पवार महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत!

देवेंद्र फडणवीस यांनी दिले चोख प्रत्युत्तर

शरद पवार महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्त मते पडली पण कमी आमदार निवडून आले तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला त्या तुलनेत कमी मते पडूनही त्यांना जास्त जागा मिळाल्या म्हणजेच काहीतरी घोळ आहे, असा तर्क मांडणाऱ्या शरद पवारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट टाकत शरद पवारांच्या या सगळ्या आकडेवारीला प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांनी शरद पवारांना उद्देशून म्हटले आहे की, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा?  चला २०२४ लोकसभेत काय झाले ते पाहू,  भाजपाला मतं १,४९,१३,९१४  आणि जागा ९, पण काँग्रेसला मतं ९६,४१, ८५६ आणि जागा १३. शिवसेनेला ७३,७७,६७४ मतं आणि ७ जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला ५८,५१,१६६ मतं आणि ८ जागा. २०१९ च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला ८७,९२,२३७ मतं होती आणि १ जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला ८३,८७,३६३ मतं होती आणि जागा ४ आल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधी यांची रवानगी तुरुंगात होणार?

लातूरमधील १०३ शेतकऱ्यांच्या ३०० एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कळसाला मिळणार सुवर्ण झळाळी!

लग्न सोहळ्यात थुंकून रोट्या बनवणाऱ्या साहिलला अटक!

शरद पवारांनी म्हटले होते की, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ८० लाख मते पडली पण त्यांच्या अवघ्या १६ जागा आल्या तर शिवसेनेला ७९ लाख मते पडली पण त्यांच्या ५७ जागा आल्या. एक लाख मते कमी पडूनही शिंदे यांच्या शिवसेनेचे ५७ आमदार कसे काय निवडून आले?  अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ५८ लाख मते पडली पण त्यांच्या ४१ जागा निवडून आल्या तर आम्हाला ७२ लाख मते पडूनही आमच्या फक्त १० जागा निवडून आल्या. हे मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने २३० जागा जिंकल्या आणि महाविकास आघाडीला अवघ्या ४६ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. ईव्हीएम मशिनवर राग काढण्यास मविआने सुरुवात केला आहे.

Exit mobile version